शोध व बचाव पथकाला सुधीर खंडारेचा मृतदेह शोधण्यात यश

0
356

शोध व बचाव पथकाला सुधीर खंडारेचा मृतदेह शोधण्यात यश

प्रतिनिधी देवेंद्र भोंडे

अमरावती/मोर्शी (6 ऑक्टो.) : इंदापूर येथील चारगड नदीमध्ये मध्ये एक इसम बुडल्याची माहिती काल दुपारी 12 च्या दरम्यान नियंत्रण कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती यांना मिळाली असता माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या आदेशाने तसेच निवासी उपजिल्हाधिकारी साहेब नितीन व्यवहारे साहेब व सुरेंद्र रामेकर साहेब जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी व पोलीस निरीक्षक मारुती नेवारे साहेब यांच्या आदेशाने शोध व बचाव पथक घटनास्थळी पोहोचले व तात्काळ शोधकार्य सुरू करण्यात आले.
मृतकाचे नाव सुधीर विठ्ठल खंडारे असून (३६) राहणार इंदापूर (निंबा) तालुका मोर्शी येथील रहिवासी होता. बोटीच्या व गळ्याच्या सहाय्याने शोधकार्य सुरू करण्यात आले. नदीपात्रात डोह व कपरी असल्याकारणाने शोध कार्यात विलंब होत होता. त्याचप्रमाणे शोध व बचाव पथकातील गोताखोर यांनी पाण्यात उतरून बॉडीचा शोध घेतला. सायंकाळी 6 वाजेच्या दरम्यान अंधार पडल्यामुळे शोधकार्य थांबवण्यात आले. दुसऱ्या दिवशी म्हणजे आज सकाळी 6 वाजता परत शोध कार्य राबवण्यात आले. अंदाजे साडे नऊच्या दरम्यान सुधीर खंडारेचा मृतदेह शोध व बचाव पथकाच्या हाती लागला.
शोध कार्यामध्ये तहसीलदार त्याचप्रमाणे पोलीस प्रशासनाचे सहकार्य लाभले. हेमंत सरकटे, योगेश घाडगे, कौस्तुभ वैद्य, देवानंद भुजाडे, अर्जुन सुंदरडे, सचिन धरमकर, अमित बुले, भूषण वैद्य, आकाश निमकर,
दीपक डोरस, संदीप पाटील, उदय मोरे, राजेंद्र शाहाकार, प्रफुल्ल भुसारी, वाहिद शेख (ड्रायव्हर) यांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here