घुग्घूस शहर काँग्रेस कमिटी तर्फे गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध
घुग्घूस : देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी संविधान निर्माते महामानव,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल संसदेत तिरस्कार पूर्ण व अपमानस्पद वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ घुग्घूस काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या नेतृत्वाखाली डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक परिसरात बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करून बाबासाहेब जिंदाबादच्या घोषणा दिल्या व गृहमंत्री अमित शहा यांच्या जाहीर निषेध व्यक्त करीत अमित शाह मुर्दाबादच्या घोषणा देत अमित शहाच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.
याप्रसंगी काँग्रेस नेते सैय्यद अनवर, ज्येष्ठ नेते नारायण ठेंगणे,शामराव बोबडे,जिल्हा महासचिव अलीम शेख,माजी उपसरपंच (नकोडा) हनिफ मोहम्मद,राष्ट्रवादी शरदचंद्र पवार अध्यक्ष दिलीप पिट्टलवार, शरद कुमार, शेख शमिउद्दीन, तालुका सचिव विशाल मादर, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष रोशन दंतलवार, जिल्हा सचिव अजय उपाध्ये, इंटक जिल्हा उपाध्यक्ष शहजाद शेख,शेखर तंगलापेल्ली, श्रीनिवास गुडला,विजय माटला,एन.एस.यु.आय अध्यक्ष आकाश चिलका, मोसीम शेख,ताज अस्लम,तालुका उपाध्यक्ष सुनील पाटील, दिपक पेंदोर,निखिल पुनघंटी,दिपक कांबळे,कुमार रुद्रारप,अभिषेक सपडी,थामस,बालकिशन कुळसंगे,शहशाह शेख,अर्नाकोंडा,देविदास पुनघंटी,अनुग्रह मायकल,सुरज ठावरी,सचिन नागपुरे,कपिल गोगला,साहिल आवळे, अंकुश सपाटे, तन्मय गहुकार,शालिनीताई भगत,महिला जिल्हा उपाध्यक्ष यास्मिन सैय्यद, जिल्हा महासचिव पदमा त्रिवेणी, महिला शहर अध्यक्ष संगीता बोबडे, शहर कार्याध्यक्ष दिप्ती सोनटक्के,जिल्हा सचिव दुर्गा पाटील,जिल्हा सचिव मंगला बुरांडे, संध्या मंडल, पूनम कांबळे, शिल्पा गोहील, प्रीती तामगाडगे, माधुरी सुटे,वैशाली दुर्योधन,भाविका आटे,व मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.