राजूर गावात ऑटोचालकांची दादागिरी वाढतच चालली…

0
526

राजूर गावात ऑटोचालकांची दादागिरी वाढतच चालली…

▪️मनोज नवले वणी:-

यवतमाळ जिल्ह्याचे वणी तालु क्या तालुक्यामधील राजूर गावात मच्छी मार्केट येथे ऑटो थांबा असतानाही ऑटो चालकांच्या त्रासापायी गावभर पायदळ चालणाऱ्यांची होतेय दमछाक…

▪️गावातील लाईफ लाईन ऑटो ठरत आहे,मुजोर लाईन…

राजूर: गावातील लाईफ लाईन ठरत आहे,मुजोर लाईन कारण गावात प्रशासनाने एक ऑटो थांबा मच्छी मार्केट येथे नियोजित केला आहे,या स्टॉप चा कोणताही ऑटो चालक वापर न करता, सीट मिळविण्याच्या हव्यासापायी गावातील मुख्य चौक भगत सिंग चौक आणि इतर चौकात अरेरावी करत मधोमध ऑटो लावून ठेवतात, पायदळ चालणाऱ्या लोकांना चालण्यासाठी रस्ता सुद्धा देत नाही. जाब विचारला तर धमकी देतात. ते ही गावात पोलीस चौकी असताना.

राजूर ते तालुक्याचे ठिकाण वणीला जाण्यासाठी प्रवाशांना एकमेव साधन म्हणजे 3 चाकी ऑटो. या ऑटो ने गावातील विद्यार्थी,कामगार,व्यावसायिक गावकरी रोज या साधनाचा उपयोग करतात. गावातील ऑटो चालक गेले 25-30 वर्षापासून ही सेवा अविरत देत आहे. एक आदर्श ऑटो चालक म्हणून राजूर च्या ऑटोचालकांची ओळख होती, पण अशा मुजोर ऑटोचालकांच्या अरेरावी मुळे चांगली ओळख धुळीस मिळाली आहे.

गावात असंख्य ऑटो असून या ऑटो ची संघटना सुद्धा कार्यरत आहे,पण ही संघटना त्या ऑटो चालकांच्या हिता पुरतीच,गावकऱ्यांच्या हिताचं काही लेन देणं नाही.

18 वर्षा खालील असंख्य चालक ट्रॅफिक पोलिसांच्या अभयामुळे दररोज राजूर ते वणी च्या नागरिकांच्या जीवघेणा खेळ खेळत असतात. अशातच कुणाचे धाक नसल्याने हे चालक मुजोरी करत भगत सिंग चौक येथे भर रस्त्यात मधोमध वाहन उभे ठेवतात.

“आपण ऑटो साईड ला केला तर दुसरा ऑटो वाला सीट उचलून घेऊन जाईल” या भीतीने कोणीही ऑटो हलवायला तयार होत नाही. कित्येकदा राजूर च्या नागरिकांनी तक्रार केल्या या बद्दल पण कुंपणच शेत खात असल्यावर दाद मागायची कुणाकडे? या विवंचनेत राजूर वासी या ऑटो चालकांची मुजोरीचा दररोज सामना करत आहेत.

“गावच्या अर्थव्यवस्थेची वाट लावण्यासाठी कारणभूत असलेला मुख्य घटक म्हणजे गावातील ऑटो” आज 7 किलोमिटर च्या अंतरावर वणी शहर असल्याने गावातील नागरिक सुई सुद्धा खरेदी करण्यासाठी याच ऑटोने वणीला जातात.

काही ऑटो चालक प्रवास्यांच्या सेवेसाठी बातमी पत्र,न्यूज पेपर, थंड पाणी अशा सेवा ऑटो चालकाचे जगभरातील आदर्शाचे किस्से ऐकताना राजूर येथील एकच किस्सा प्रसिद्ध आहे तो म्हणजे ‘मोठ्या किर्र आवाजात गाणे वाजविणे’. मग प्रवासी हे बिमार असो,विद्यार्थी असो,वयोस्कर असो… या मुजोरांवर त्याचा काही परिणाम होत नाही. म्हणून मुजोर हा सिक्का राजूर ऑटो चालकांवर लागला तितकेच सत्य…

अशा या मुजोर ऑटो चालकांना प्रशासनाने लक्ष देत गावातील वाहतूक कायदा व्यवस्थेचे धडे देत गावकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी गावातील सामाजिक संघटना व गावकरी करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here