चंद्रपूरात येत्या साेमवारला राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या वतीने बोंबाबोंब आंदोलन

0
501

चंद्रपूरात येत्या साेमवारला राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या वतीने बोंबाबोंब आंदोलन

आंदाेलनात सहभागी हाेण्याचे प्रा. सुचिता खाेब्रागडेंनी केले आवाहन

चंद्रपूर (विदर्भ), किरण घाटे/विशेष प्रतिनिधी : चंद्रपुर शहरात येत्या सोमवार दि. १९ जूलैला राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ महाराष्ट्र शाखा आणि सर्व सहयोगी राजकिय, सामाजिक संघटनांच्या वतीने अनुसुचित जाती, अनुसुचित जनजाती, भटक्या जमाती, विशेष मागासप्रवर्ग व ओबीसी या बहुजनांच्या संविधानिक प्रतिनिधित्व (आरक्षण) आणि हक्क-अधिकार संपविणा-या धोरणाच्या व शासन आदेशांच्या विरोधात तसेच शेतकरी विरोधी, कामगार कायदे विरोधी, विद्यार्थी विरोधी, शिक्षणक्षेत्रातील खाजगीकरण, कंत्राटी पद्धती, शिक्षण सेवक, सीएचबी, अंगणवाडी सेविका , नवीन पेंशन योजना, रोस्टर अंमल बजावणी इत्यांदी १४ मुद्यांवर शासनाच्या बहुजन विरोधी धोरणाच्या विरोधात आंदोलन हाेणार आहे.

पद्दोन्नतितील आरक्षणाविषयी शासनाने दि. १८ फेब्रूवारी, २० एप्रिल व ७ मे २०२१ रोजी काढलेल्या शासन निर्णय हा बहुजन विरोधी, संविधान विरोधी तसेच सुप्रीम कोर्टच्या निर्णयाचे अवमानना करनारा आहे. पदोन्नतिच्या कोट्यातील रिक्त असलेली सर्व १०० टक्के पदे खुल्या प्रवर्गातुन व सेवाजेष्ठता नुसार भरण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. तो निर्णय मा. सर्वोच्च न्यायालयाचा सुद्धा अवमानना आहे. तसेच या आदेशाने महाराष्ट्रातील तमाम अनुसूचित जाती – जमाती, भटके विमुक्त, विशेष मागास प्रवर्ग व इतर मागासवर्गीय यांना संविधानीक अधिकार नाकारून त्यांचा सुद्धा अपमान व अवहेलना आणि मानहानी शासन या कृतीतून करीत आहे.

सदरील आदेश दुरुस्त करून ३३ टक्के पदोन्नतितील आरक्षण मुद्द्यावर सर्व बिंदु समाविष्ट करावे त्याचप्रमाणे एससी, एसटी, एनटी, व्हीजे एनटी, एसबीसी, ओबीसी यांची पद्दोन्नतिची प्रक्रिया एक महिन्यात पूर्ण करावी. याकरीता या सर्व बहुजन विरोधी धोरणामुळे बहुजनाचे संविधानीक प्रतिनिधित्व आरक्षण व मूलभूत हक़्क़ अधिकार संपविले जात आहेत. महाराष्ट्र शासनाच्या या अनुसूचित जाती – जमाती, निर अधिसूचित जाती, भटके विमुक्त, विशेष मागास प्रवर्ग व इतर मागासवर्गीय आणि मराठा बांधवाच्या विरोधातील धोरणाच्या आणि शासन आदेशाच्या विरोधात राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघ, महाराष्ट्र राज्य शाखा व ऑफशूट विंग आणि सहयोगी सामाजिक, राजकीय संघटनाच्या वतीने राज्यस्तरीय चरणबद्ध “प्रतिनिधित्व (आरक्षण) बचाओ, लोकतंत्र बचाओ आंदोलन ” १९ जूलैला सर्व सरकारी कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन आयोजित करण्यात आले असल्याचे संघटनेने प्रसिध्दीसाठी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

यात वीज कार्यालय बाबुपेठ, लघु पाठबंधारे, जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, एसटी वर्कशॉप, बस स्थानक, प्रशासकीय कार्यालय, जिल्हा कार्यालय, पंचायत समिति, तहसिल कार्यालय, समाजकल्याण कार्यालय यांचा समावेश असेल त्यानंतर महत्वाचे कार्यलयात आन्दोलन करून शेवटी तहसिलदार मार्फत मुख्यमंत्री, मुख्यसचिव यांना निवेदन देण्यात येईल.

तेव्हा चंद्रपुर मधील सरकारी कार्यालयातील सर्व कर्मचारी पदाधिकारी, बुद्धिजीवी, बहुजन समाजासाठी कार्य करणाऱ्या संघटना, विद्यार्थी, महिला, शेतकरी, कष्टकरी कामगार याना विनंती करण्यात येते की त्यांनी मोठया संख्येने या आंदोलनात सहभागी व्हावे. असे आवाहन राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघ यांच्या संयोजक तसेच प्रोटान कार्याध्यक्षा प्रा. सूचिता खोब्रागडे, डॉ. ज्योत्स्ना भागवत, के. एस. पडवेकर, प्रदीप जिन्दे, राकेश उरकुड़े व इतर कार्यकर्त्यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here