एरंडोल येथे धरणगाव चौफुलीवर रात्री गस्तीवर असणाऱ्या पोलिसांनी वाचवले कत्तलिसाठी नेल्या जाणाऱ्या गायींचे प्राण.

0
643

एरंडोल येथे धरणगाव चौफुलीवर रात्री गस्तीवर असणाऱ्या पोलिसांनी वाचवले कत्तलिसाठी नेल्या जाणाऱ्या गायींचे प्राण.

प्रमोद चौधरी

जळगाव जिल्हा प्रतिनिधी

एरंडोल येथे शनीवारी राजी धरणगाव हायवे चौफुली वर गस्त घालणारे पोलिस कर्मचारी विलास पाटील व त्यांच्या सहकार्यांनी गतीरोधकावर कत्तलिसाठी नेल्या जाणाऱ्या तीन गायी व एक वासरू जीवंत स्थितीत दोराच्या सहाय्याने बांधलेले वाहन रंगेहाथ पकडले व त्यांना जीवनदान दिले. पोलिसांना पाहताच वाहनचालकासह त्याचे दोन्ही साथीदार हे वाहन सोडून पलायन करण्यात यशस्वी झाले . सदर गायींची नजिकच्या गोशाळेत रवानगी करण्यात आली असुन हा प्रकार शनीवारी भल्यापहाटे उघडकीस आला.या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे . याबाबत एरंडोल पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे . याबाबत एरंडोल पोलीस स्टेशन सुजांनी दिलेली माहीती अशी की एम.एच .४१ जी – ९ ३५२ या क्रमांकाच्या वाहनात तीन गायी व एक वासरू जीवंत स्थितीत दोराच्या सहाय्याने बांधुन कत्तलिसाठी नेण्याच्या उद्देशाने दाटीवाटीने कोंबून भरलेल्या स्थितीत पोलिसांना मिळुन आले . गायींसह एकूण १ लाख ३८ हजार रूपये किंमतीचे वाहन जप्त करण्यात आले असुन पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक तुषार देवरे , विलास पाटील , पंकज पाटील , संदीप सातपुते , अमीत तडवी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here