दिव्यांग बांधवासांठी स्वतंत्र लसीकरण केंद्र तयार करा – आ. किशोर जोरगेवार

0
487

दिव्यांग बांधवासांठी स्वतंत्र लसीकरण केंद्र तयार करा – आ. किशोर जोरगेवार

जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्याशी चर्चा करत केल्या सुचना

चंद्रपूर/प्रतिनिधी : कोरोनाला हरविण्यासाठी लसीकरण हा एकमात्र उपाय आहे. त्यामूळे समाजातील सर्व घटकांना कोणत्याही अडचणी शिवाय लसीकरण करता यावे या दिशेने प्रयत्न करण्याची गरज व्यक्त करत दिव्यांग बांधवांसाठी स्वतंत्र लसीकरण केंद्र सुरु करण्याच्या सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना केल्या आहे.
कोरोनाची संभावित तिसरी लाट रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने आज पासून निर्बंध कडक केले आहे. याच पाश्र्वभूमीवर आमदार किशोर जोरगेवार यांनी आज सोमवारी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांची भेट घेतली असून अनेक सुचना केल्या आहे.
कोरोनाच्या दुस-या लाटेत मुबलक संसाधनांअभावी चंद्रपूरकरांना मोठी किंमत चुकवाली लागली आहे. त्यामूळे तिसरी लाट येण्याआधिच योग्य उपायोजना करण्याच्या दिशेने प्रशासनाने उपाययोजना करायला सुरवात केली आहे. दरम्याण आज आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेतली आहे. यावेळी लसीकरणावर जोर देत अधिकाधिक नागरिकांचे लसीकरण करण्याच्या दिशेने प्रयत्न करण्याच्या सुचना केल्या आहे. लसीकरण मोहिमेत दिव्यांग बांधवांची गैरसोय टाळण्यासाठी विषेश प्रयत्न करण्याची गरज असल्याचेही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे. तसेच दिव्यांग बांधवांच्या लसीकरणासाठी स्वतंत्र लसिकरण केंद्र तयार करण्याच्या सुचनाही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना दिल्या आहे. या लसीकरण केंद्राबाबत व येथील लसींच्या साठ्याबाबतची माहिती दिव्यांग बांधवांना मिळत राहावी अशी यंत्रणाही सुसज्ज करण्याच्या सुचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या आहे.

50 लोकांच्या उपस्थितीत लग्न समारंभ करण्यास मंगल कार्यालयांना परवाणगी देण्यात यावी – आ. किशोर जोरगेेवार

कोरोनाच्या डेल्टा प्लस वेरियंटचा प्रादुर्भाव वाढण्यापूर्वीच रोखण्यासाठी प्रशासनाने आज पासून कडक निर्बंध लावले आहे. मात्र अनेकांनी लग्न संमारंभासाठी मंगल कार्यालये बुक करु ठेवली आहे. अशात सदर मंगल कार्यालयांना 50 नागरिकांच्या उपस्थितीत लग्न समारंभ उरकण्यासाठी परवाणगी देण्यात यावी अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांची भेट घेत केली आहे.
सध्या लग्न समारंभाचे सिजन असल्याने अनेकांनी मंगल कार्यालये बुक केली आहेत. अशात आज पासून लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधामूळे सदर नागरिकांमध्ये तसेच मंगल कार्यालयांच्या मालकांमध्ये सभ्रमास्थिती निर्माण झाली आहे. त्यामूळे या सर्व बाबींचा विचार करुन नियम व अटींसह 50 लोकांच्या उपस्थितीत शुभकार्य पार पाडण्यासाठी मंगल कार्यालयांना परवाणगी देण्यात यावी याबाबत आज आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्याशी चर्चा केली असून लवकरच याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे. यावेळी ग्यानचंद्र पबनानी, शिखर कॉडला,श्रीकांत बुरडकर,योगेश भंडारी, ओमप्रकाश जाजू आदींची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here