बिनागुंड्याला पर्यटन क्षेत्र घोषित करून विकास करावा

0
607

बिनागुंड्याला पर्यटन क्षेत्र घोषित करून विकास करावा

आमदार डॉक्टर देवराव होळी

आमदार डॉक्टर देवरावजी होळी हे ठरले या अतीदुर्गम भागात जाणारे पहिले आमदार

गडचिरोली सुखसागर झाडे: भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेले बिनागुंडा हे अत्यंत निसर्ग रम्य व पर्यटनाचे क्षेत्र असून स्वातंत्र्याच्या 72 वर्षानंतरही विकासापासून वंचित आहे.त्यामुळे बिनागुंड्याला पर्यटन क्षेत्र घोषित करून या क्षेत्राचा विकास करावा अशी मागणी आमदार डॉ देवराव जी होळी यांनी केली आहे.
बिनागुंडा क्षेत्रातील समस्या जाणून घेण्यासाठी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी व जिल्हा परिषदेचे कृषी सभापती रमेश भाऊ बारसागडे यांनी या गावाला भेट दिली. भेटीदरम्यान त्यांनी बिनागुंडा परिसरातील शेत शिवाराची पाहणी करीत शेतकऱ्यांच्या समस्याही जाणून घेतल्या .या परिसरातील समस्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी उपस्थित स्थानिकांना दिले.
गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील दुर्गम क्षेत्रात अत्यंत निसर्गरम्य परिसरात बिनागुंडा हे लहान गाव वसलेले आहे. नयनरम्य वातावरणात लाभलेले हे गाव स्वातंत्र्याच्या ७२ वर्षानंतर विकासापासून आजही दूर आहे. या भागातील काही स्थानिकांनी आमदार डॉ देवरावजी होळी व जिल्हा परिषदेचे कृषी सभापती रमेशभाऊ बारसागडे, याना आपल्या समस्यांबाबत अवगत केले त्यांच्या आग्रहातर आज या भागाचा दौरा केला. या प्रवासात त्यांनी या भागातील विविध स्थळांना भेटी दिल्या व परिसरातील समस्या जाणून घेतल्या.
72 वर्षाच्या इतिहासात प्रथमच आमदार असलेली व्यक्ती या अतिदुर्गम गावात गेली. आमदार डॉक्टर देवरावजी होळी हे या अतीदुर्गम गावात जाणारे पहिले आमदार ठरले असून या क्षेत्राचा विकास करण्यासाठी आपण पुढाकार घेऊ. या क्षेत्राचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास घडवून आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here