सरकार नगर योगा डान्स ग्रुप द्वारा आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा
🔶🟣🟢चंद्रपूर🔶🟢किरण घाटे🔶🟢🟣🔴
सोमवार दि. 8 मार्चला सायंकाळी सरकार नगर ग्राउंडवर ‘सरकार नगर योगा ग्रुप द्वारा’ ‘जागतिक महिला दिवसाचा’ कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून डॉ. गोपालजी मुंधडा लाभले, हाेते तर प्रमुख पाहुणे म्हणून शुभम देवनाथ, सोनम मडावी (सखी मंच संयोजिका) उपस्थित हाेते .या वेळी मान्यवरांनी उपस्थित महिलांना मोलाचे मार्गदर्शन केले.
आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून प्रभागातील वयोवृद्ध, प्रतिष्ठित महिला आदर्श शिक्षिका गीता किसन आवारी, तसेच आदर्श माता शलाका इटनकर ह्यांचा सत्कार करण्यात आला.
🟡🔴🟣🟠🟢🟤🟡🔵🟣🟡🔶
याच कार्यक्रमा अंतर्गत माधुरी वाटेकर यांच्या वाढदिवस सर्वांच्या उपस्थितीत साजरा करण्यांत आला . विविध स्पर्धेचे आयोजन करून विजयी सदस्यांना पारितोषिकही देण्यात आले.
🟢🟣🟡🔴🟠🟤🟣🟡🔴🟠🔶
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषण वनश्री मेश्राम यांनी केले तर आभार प्रदर्शन एकता पीत्तुलवार यांनी केले. सदरहु समारंभाचे सुत्र संचालन भावना टेकाम यांनी केले कार्यक्रमाला प्रभागातील महिलांची उपस्थिती लक्षणिय हाेती .
