खड्ड्यात हवन आंदोलन करून वेधले प्रशासनाचे लक्ष

0
535

खड्ड्यात हवन आंदोलन करून वेधले प्रशासनाचे लक्ष

 


राजुरा : काल दिनांक 4 ऑक्टोम्बर ला दुपारी 1 ते 3 वाजेच्या दरम्यान राजुरा शहरातील तहसील कार्यालय व बसस्थानक दरम्यानच्या वळण रस्ता येथील श्री. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे अनोख्या पद्धतीने खड्ड्यात हवन आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.

याठिकाणी दिवसेंदिवस सातत्याने कोणाचे न कोणाचे अपघात होत आहे. तरी प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. या करिता राजुरा वाहन चालक मालक संघटने तर्फे शहरातील मुख्य राज्य महामार्गावर पडलेल्या यमराजरुपी खड्याची हवन पूजा करून आंदोलन करण्यात आले. किमान जिल्हा प्रशासनाला प्रकाराची गंभीरता वाटेल आणि जाग येईल व रस्ते दुरुस्तीसाठी लवकरात लवकर पाऊले उचलून रस्ता दुरुस्तीचे कार्य पूर्ण करण्यात येईल यासाठी हवन आंदोलन करण्यात आले. प्रशासनाचे दुर्लक्ष का…? हा प्रश्न जनतेसमोर ‘आ’ वासून शहरवासीयांपुढे उभा असून स्थानिक लोक प्रतिनिधींची असंवेदनशीलता व प्रशासनाच्या कार्य प्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

यावेळी बलवंत ठाकरे, किशोर शेंडे, भाऊजी कन्नाके, कार्तिक सोमलकर, शुभम ठाकरे, प्रतिक कावळे, जयपाल ठाकूर, शुभम निंदेकर, टुमेश ठाकरे, आकाश वाळई, गुड्डू वासाडे, संदीप मानुसमारे, मारोती निमकर, पप्पू मावळणकर, वासुदेव मोहुरले, प्रशांत रागीट, राहुल पवणकर, बलदेव तिवारी, चंदू तपासे, प्रकाश तायडे, विष्णू निवलकर, गज्जू मस्की, राम येल्लेवार, जिशान शेख, अतुल मालेकर आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here