हिंगणघाटाचे चार तरुण डॉक्टर करणार कोविड रूग्णांवर उपचार!

0
576

हिंगणघाटाचे चार तरुण डॉक्टर करणार कोविड रूग्णांवर उपचार!

हिंगणघाट, अनंता वायसे : हिंगणघाट शहर व ग्रामीण परिसरात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचा पार्श्वभूमीवर येथील चार तरुण डॉक्टरांनी येथील स्थानीक रूग्णांवर येथेच उपचार करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली होती व या चार तरुण डॉकटरांची जिजीविषा पाहून १० बेडसच्या कोविड रुग्णालयाला मंजुरी देण्याचा सकारात्मक निर्णय प्रशासनाने घेतलेला आहे.
येथील नांदगाव रोडवरील अरिहंत क्रिटिकल केअर सेंटर येथे येथील चार तरुण हृदयरोगतज्ञ डॉ राहुल मरोठी, डॉ.श्री गोपाल मानधनिया,डॉ निर्मेश कोठारी,डॉ प्रसाद गमे हे चार डॉकटर कोविड रूग्णांवर उपचार करणार आहेत.
या चार तरुण डॉकटरांनी कोविडची वाढती रुग्णसंख्या व येथील उपजिल्हा रुग्णालयातील मर्यादित क्षमता लक्षात घेऊन कोविड सेंटरची मागणी केली होती .प्रशासनाने 10 रूग्णांवर उपचार करण्याची परवानगी देऊन ही मागणी मान्य करून येथील रुग्णांना दिलासा दिलेला आहे. या रुग्णालयाला मंजुरी प्राप्त करण्यासाठी पालकमंत्री ना.सुनील केदार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.तडस, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ किशोर चाचरकर, यांनी सहकार्य केले .वाढती रुग्णसंख्या पहाता या रुग्णालयाला 40 बेड्सची मंजुरी देण्यात यावी अशी जनतेची मागणी आहे.विशेष म्हणजे मागील काही महिन्यांपासून येथील अनेक रुग्णांना उपचारासाठी बाहेरगावी जावे लागत आहे. बाहेरगावी जाण्याचा विनाकारण अतिरिक्त भुर्दंड रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांवर पडत आहे. मानसिक, शारीरिक त्रासासोबत आर्थिक संकटात रुग्ण पडत असल्याचे पाहून येथील चार तरुण डॉकटरांनी कोविडच्या या संकटकाळात आपल्या गावाच्या जनतेच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला.या कोविड रूग्णांवर उपचार करणे हे जीवघेणे काम आहे हे माहीत असूनही येथील या चार तरुण डॉक्टरांनी कोविड रुग्णालय सुरू करण्याचा धाडशी निर्णयाचे येथील सर्वसामान्य जनता अभिनंदन करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here