कासव गतीने चालेल्या कामा मुळे वाहतूक अडथळा दू चाकी वाहन चालकांना नाहक त्रास

0
419

रस्त्याच्या संथपणे चाललेल्या कामामुळे वाहतुकीची समस्या निर्माण!
सायंकाळी करावी लागते वाहन चालकांना तारेवरची कसरत.

कोरपना ( ता.प्र.) गडचांदूर शहरातून जाणाऱ्या मुख्य राज्य महामार्गाचे काम मागील काही महिन्यांपासून संथपणे या रस्त्याचे काम सुरू असून शहरातील वाहतूक पुर्णतः विस्कळीत झाली आहे त्यामुळे वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
या मुख्य राज्य महामार्गावरून रोज शेकडो अवजड वाहने, परिवहनच्या बसेस आणि अनेक छोटे मोठे वाहने धावत असतात यामुळे शहरातील बसस्थानक परिसरात रस्त्यावरच वाहनांच्या रांगा लागल्या जाते त्यामुळे वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे त्यामुळे या बसस्थानक चौकात अपघाताची शक्यता नाकारता येत नाही अशा ठिकाणी वाहतूक पोलिस नावालाच आहे एक ते दीड तास उभे राहून कधीही पलायन करतात त्यामुळे या वाहतूक विस्कळित होऊ नये म्हणून वाहतूक पोलिसांनी सुध्दा वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहन चालकांना मदतीसाठी परिसरात सदैव तत्पर रहावे कारण म्हणजे बिनधास्त वेगाने वाहन चालविणारे अल्पवयीन मुलांच्या संख्येत वाढ झाली असून यांच्या वर सुध्दा थोडाफार धाक निर्माण होवून या घाईगर्दीत वाहन चालवणार नाही.
राज्य महामार्गाचे काम करणाऱ्या कंपनी प्रशासनाने वेळीच काम करून वाहतूकीची कोंडी झाली आहे ती सुरळीत करण्यासाठी आपले काम करून हा मार्ग वाहतुकीसाठी मोकळा करून देण्यात यावात अशी रास्त मागणी वाहन चालकांची आहे.कारण सायंकाळी तर लांबच लांब रांगा लागल्या दिसून येते आहे त्यामुळे दुचाकी वाहन चालकांना पंधरा ते वीस मिनिटे ताटकळत उभे राहावे लागत असल्यामुळे वाहन चालक त्रस्त झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here