प्रसिध्दीपराडमूख नेत्यास समाज मुकला – आ. किशोर जोरगेवार

0
549

शोकसंदेश

प्रसिध्दीपराडमूख नेत्यास समाज मुकला – आ. किशोर जोरगेवार

अतिषय शांत स्वभावाने सा-यांनाच आपलेसे वाटणारा प्रसिध्दीपराडमुख नेत्यास समाज मुकला असल्याची शोकसंवदेना राज्याचे माजीमंत्री संजय देवतळे यांच्या निधनानंतर आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केली.
सलग चार वेळा वरोरा – भद्रावती विधानसभेचे नेतृत्व त्यांनी केले. या काळात त्यांनी आपल्या शांत स्वभावाने कार्यकर्ते जोडत संघटन बळकट केले. त्यांच्या नेतृत्वात अनेक स्थानिक स्वराज्य संस्थेवर पक्षांचा झेंडा फडकविला. काॅंग्रेस सरकारच्या काळात त्यांच्यावर कॅबिनेट मंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली. ती ही त्यांनी उत्तम रित्या पेलली. आज त्यांच्या जाण्याने राजकीय क्षेत्राचे मोठे नूकसान झाले आहे. ईश्वर त्यांच्या परिवराला या दुखातून सावरण्याचे बळ देवो हीच प्रार्थना करतो अशा शब्दात आमदार किशोर जोरगेवार यांनी शोकसंवेदना व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here