शरदचंद्र पवार कला महिला महाविद्यालयात जयंती साजरी

0
548

शरदचंद्र पवार कला महिला महाविद्यालयात जयंती साजरी

सुखसागर झाडे । क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले तथा महामानव, बोधिसत्व, विश्वरत्न, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली.
आज दिनांक 14 एप्रिल 2021 रोज बुधवारला शरदचंद्र पवार कला महीला महाविद्यालयात कोविड 19 नियमांचे तंतोतंत पालन करीत अत्यंत साध्या पद्धतीने महात्मा फुले व महामानव, बोधिसत्व, विश्वरत्न, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस दिप प्रज्वलन व पुष्पगुच्छ बहाल करुन प्रतिमेस मानवंदना देत संयुक्त जयंती महाविद्यालयात साजरी करण्यात आली.
याप्रसंगी शरदचंद्र कला महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भगवान व्ही. धोटे यांनी महामानवांच्या जिवन कार्यावर प्रकाश टाकला. व त्यांचे मौल्यवान विचार प्रत्येकांनी जिवनात अंगिकारावे असे प्रतिपादन केले. याप्रसंगी प्रा. सूखसागर झाडे, प्रा. कु.ललिता वसाके,प्रा.निनांद देठेकर प्रा. सोनी आभारे,शिक्षकेतर कर्मचारी वृंद -श्री.सुनील आभारे, सौरव सहारे, भावना सुर, संजय गडकर, आशिष मेश्राम, भावना चांदेकर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्वांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here