सरपंच पदी ज्योत्स्ना सत्यपाल दुर्गे तर उपसरपंच पदी घनश्याम बापूजी दोरखंडे यांची निवड

0
537

सरपंच पदी ज्योत्स्ना सत्यपाल दुर्गे तर उपसरपंच पदी घनश्याम बापूजी दोरखंडे यांची निवड

धानोरा ग्रामपंचायतीवर शेतकरी संघटना, भाजपा समर्थीत युवा ग्रामविकास आघाडीचा ताबा

विरुर (स्टे.) । राजुरा तालुक्यातील धानोरा ग्रामपंचायतीत 15 फेब्रुवारीला सरपंच पदी ज्योत्स्ना सत्यपाल दुर्गे तर उपसरपंच पदी घनश्याम बापूजी दोरखंडे यांची निवड झाली आहे. सात सदस्यीय धानोरा ग्रामपंचायात मध्ये पाच मते घेऊन शेतकरी संघटना, भाजपा समर्थीत युवा ग्रामविकास आघाडीने सरपंच व उपसरपंच पदी आपला ताबा मिळवला. यावेळी साधना गणपत टेकाम, सविता संतोष गौरकार, सुवर्णा एकनाथ हजारे या ग्रामपंचायत सदस्यांनी सहकार्य केले.
मागील अनेक वर्षांपासून या ग्रामपंचायतीवर काँग्रेसचे वर्चस्व होते. येथील माजी पंचायत समिती अध्यक्ष यांचा गड मानल्या जाणाऱ्या मायगावी त्यांना पराभव स्वीकारावा लागला.
ग्रामपंचायत निवडणुकीची संपूर्ण धुरा सत्यपाल दुर्गे यांनी सांभाळली. त्यांनी स्वतःही हि निवडणुकीत लढवली मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागला. मात्र त्यांच्या बाजूचे पाच उमेदवार विजयी झाले. सत्यपाल दुर्गे यांना जीवन आमने, जयराज दोरखंडे आणि संजू बलकी यांनी मोलाचे सहकार्य केले.
नवनियुक्त सरपंच व उपसरपंच यांचे तंटामुक्त समिती अध्यक्ष, वन समिती अध्यक्ष, पोलीस पाटील यांनी अभिनंदन केले. सत्यपाल दुर्गे यांनी गावातील सर्व गावकरी व मतदार यांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here