मद्यधुंद दारुड्याचा विना तिकीट बस मधुन प्रवास

0
572

मद्यधुंद दारुड्याचा विना तिकीट बस मधुन प्रवास ! त्यास बसमधुन खाली उतरविण्यांस करावी लागली चालक वाहकास तारेवरची कसरत !

किरण घाटे

चंद्रपुर:-   चंद्रपूर ,वर्धा तथा गडचिराेली या जिल्ह्यात तशी दारुबंदी ! परंतु माेठ्या प्रमाणात छुप्या मार्गाने या जिल्ह्यात दारु येत आहे हे सत्य नाकारता येत नाही! दारु तस्कर जेवढे सक्रिय तेवढ्याच पाेलिसांच्या दारु विक्रेत्यांवर कारवाया सुरु असल्याचे नित्य द्रूष्टीक्षेपात पडत आहे .काल तर चक्क एका दारुड्या प्रवास्याने झाेपेत (धावत्या) बसमधुन प्रवास केला.

बुधवार दि.२५नाेव्हेबरला सकाळी १०वाजुन ३०मिनिटांनी चंद्रपूरच्या बसस्थानकांवरुन वणी साठी जाण्यांस (घुग्गुस मार्गे )बस निघाली. या बस मध्ये काही प्रवासी प्रवासासाठी बसले ! त्यात एका दारुड्या प्रवास्यांचा समावेश होता !सर्वात मागिल सिट वर निवांत झाेपून त्याचा प्रवास सुरु झाला .धावत्या बस मध्येच वाहक प्रवास्यांच्या तिकीटा घेवू लागला ! शेवटी त्या (दारुड्या) प्रवासी पर्यंत वाहक पाेहचला ! पण अति मद्यधुंद ताे दारुड्या ना उठण्याचा स्थितीत हाेता !ना ही तिकीट काढण्यांच्या मनस्थितीत हाेता ! अखेर पडाेली ते घुग्गुस जाणां-या मार्गावरील पांढरकवडा येथे चालकांने बस थांबवली व त्या दारुड्यासं वाहक व चालक यांनी बसमधील प्रवास्यांचे मदतीने अथक प्रयत्न करुन खाली उतरविले नंतरच बसचा घुग्गुस वणी कडे परत प्रवास सुरु झाला.दरम्यान त्या दारुड्या प्रवास्यास त्याचे दाेन मित्रांनी बस मध्ये साेडुन दिल्याची प्रवासी वर्गात चर्चा हाेती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here