रक्तदान शिबिराचे भव्य आयोजन, रक्तदात्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद!

0
550

रक्तदान शिबिराचे भव्य आयोजन, रक्तदात्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद!
उस्मानाबाद, किरण घाटे । संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समिती उस्मानाबादच्या वतीने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सामुहिक बुद्ध वंदना घेऊन अभिवादन करण्यात आले.कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे शासनाच्या नियमांचे काटेकाेर पालन करीत फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समिती उस्मानाबाद व नगर सेवक सिध्दार्थ बनसोडे यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबीर काल घेण्यात आले.रक्तदात्यांनी या उपक्रमाला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. यावेळी आमदार कैलास पाटील नगराध्यक्ष मकरंद राजे निंबाळकर,फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीचे बाबासाहेब बनसोडे,धनंजय वाघमारे,गणेश रानबा वाघमारे, संग्राम बनसोडे, संजय गजधने,स्वराज जानराव,सागर गायकवाड तर नगरसेवक सिध्दार्थ बनसोडे, राणा बनसोडे, बाळासाहेब काकडे, मृत्युंजय बनसोडे,काॅग्रेसचे जिल्हाध्यक्ष धिरज पाटिल, राजाभाऊ शेरखाने आशिष मोदाणी अग्निवेश शिंदे प्रशांत पाटील, देवानंद एडके,अजय वाघाळे, प्रभाकर निपाणीकर, अमित बनसोडे, सचिन धाकतोडे,सचिन वाघमारे, रमाकांत माळाळे, दुष्यंत बनसोडे,सुशिल गायकवाड उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here