आम्ही काँग्रेसचे निष्ठावंत, आम्ही काँग्रेसमध्येच कार्यकर्त्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : आमदार सुभाष धोटे

0
166

आम्ही काँग्रेसचे निष्ठावंत, आम्ही काँग्रेसमध्येच
कार्यकर्त्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : आमदार सुभाष धोटे


राजुरा (चंद्रपूर), १२ फेंब्रू. : नुकताच काँग्रेसचे मोठे नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांना दिला आहे. यामुळे अशोक चव्हाण यांच्या समवेत आणखी काही निवडक आमदार काँग्रेस पक्षाला सोडचीठ्ठी देण्याच्या बातम्या प्रसार माध्यमांत प्रसारित होत आहेत. यात राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांचाही उल्लेख करण्यात आला आहे. याला प्रतिक्रिया देताना आमदार धोटे यांनी आपण काँग्रेस पक्षाशीच असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

इलेक्ट्रॉनिक माध्यमातून तसेच समाज माध्यमातून प्रसारित होणाऱ्या बातम्यांतून काहीतरी खोडसाळपणा दिसून येत आहे. मी स्वतः आणि चंद्रपूर जिल्ह्यातील काँग्रेसचे सर्व आमदार हे काँग्रेसचे निष्ठावंत सैनिक आहेत. आमचे कुटुंब माझ्या वडीलांपासून काँग्रेस पक्षाशी निष्ठावंत आहे. मी अगदी युवा अवस्थेपासून काँग्रेस पक्षाचे काम करीत आहे आणि सदैव काँग्रेस पक्षाचेच काम करीत राहणार आहे. आम्ही सर्व काँग्रेस पक्षाची विचारसरणी, पुरोगामी विचारधारा यासह घट्ट बांधलेले आहोत. माझ्यासह चंद्रपूर जिल्ह्यातील कोणीही काँग्रेस आमदार भाजप मध्ये प्रवेश करण्याचा प्रश्नच येत नाही.

प्रसारमाध्यमांतून प्रसारित होणाऱ्या बातम्या निराधार आणि खोडसाळ असून चंद्रपूर जिल्ह्यातील माझ्या व काही काँग्रेस आमदारांबाबतचे वृत्त पूर्णपणे निराधार आहे. आम्ही सर्व काँग्रेसचे निष्ठावंत काँग्रेसमध्येच आहोत. कार्यकर्त्यांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेसच्या बाजूने वातावरण असून चंद्रपूर वणी अर्णी लोकसभा सह जवळपास सर्वच विधानसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून येण्याची पूर्ण शक्यता आहे, अशी प्रतिक्रिया चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here