घुग्घुस येथील रमाबाई बौद्ध महिला मंडळातर्फे वर्षावास कार्यक्रम

0
257

घुग्घुस येथील रमाबाई बौद्ध महिला मंडळातर्फे वर्षावास कार्यक्रम


पंकज रामटेके / विशेष प्रतिनिधी

घुग्घुस येथील रमाबाई बौद्ध महिला मंडळ काॅ.न.२ विहारात वर्षावास अधिष्ठान कार्यक्रम आयोजित करण्यात आले.तसेच तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून एकत्रित सामूहिक बौध्द वंदना घेण्यात आले.तसेच दरवर्षी प्रमाणे या वर्षीपण आषाढ पौर्णिमा,अश्विन पौणिमा पर्यंत वर्षावास अधिष्ठान कार्यक्रम सुरु करण्यात आला.बुद्ध परंपरा आज काळाची गरज आहे.

विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर लिखित तथागत गौतम बुद्ध व त्यांचा धम्म महान ग्रंथाचा वाचन करण्यात आले,या वर्षावास कालावधीत ज्या,ज्या धम्म उपासक,उपासिका यांनी तीन,चार महिण्यात वेळात,वेळ काढून बुद्ध वंदना, कंटस्त (पाठ) केले व धम्माचा प्रचार व पसार केले.त्या धम्म सेवकांच्या व लहान मुलींच्या सन्मानित सत्कार करण्यात आला.

आयु.श्याम कुमरवार व आयु.पुनम मानकर यांनी आपले मार्गदर्शन मनोगत व्यक्त केले.

यावेळी प्रामुख्याने सुषमा चांदेकर, पूनम मानकर(बोरकर), दिव्यता कास्वटे,प्राची परागे,कविता परागे, नंदा स.कांबळे, संगीता कासवटे,रीता कोवले,मंदा धोपटे,सुनंदा माहूलकर, निळूबाई कोंडागूर्ला,सुनंदा चांदेकर,कलाबाई कोंडे,अनिरुद्ध चांदेकर व इतर धम्म उपासक, उपासिका यांनी उपस्थिती दर्शविली कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार प्रदर्शन आयू. लक्ष्मीबाई चांदेकर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here