भीम आर्मी शेवटी ‘करो या मरो’ च्या भूमिकेत…

0
867

भीम आर्मी शेवटी ‘करो या मरो’ च्या भूमिकेत…

 

चंद्रपूर : अनायश्या वाहन चालक व इतर संघटन च्या वतीने सीसीआर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत कार्यरत वाहन चालक बांधवाना मागील पाच महिन्यापासून वेतन न दिल्या कारणास्तव त्यांच्या न्यायिक हक्कासाठी भीम आर्मी (भारत एकता मिशन) जिल्हा चंद्रपूर तर्फे एक दिवसीय धरणे आंदोलन संविधानिक पद्धतीने शिस्तबद्ध स्वरूपाने करण्यात आले. तेव्हा राजुरा पोलीस स्टेशनच्या मध्यस्थीने आमच्या मागण्या पूर्ण करण्यास सीसीआर कंपनी तयार आहे असे आश्वसीत केले. परंतु शेवटी सीसीआर कंपनीने यू टर्न घेत लिहून देण्यास नकार दिला. त्यामुळे आक्रोश आंदोलन करण्यात आले.

सदर आंदोलन संविधानिक पद्धतीने पार पाडल्या गेले. पण सीसीआर कंपनीने याची साधी दखलही घेतली नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. कंपनीत कार्यरत असलेल्या सर्व वाहन चालक बांधवावर व त्यांच्या परिवारावर उपास मारीची वेळ आली आहे, त्यामुळे शेवटी त्या सर्वांनी मिळून त्यांच्या न्याय हक्कासाठी भीम आर्मी जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र रायपुरे यांच्या नेतृत्वात आणि जिल्हा उप प्रमुख सुरज उपरे यांच्या मार्गदर्शनात दिनांक 05/08/2022 ला दुपारी 12:30 पासून गौरी डीप गेट समोर आमरण उपोषणास सुरवात केली आहे.

आमरण उपोषणा मध्ये प्रामुख्याने तोफीक शेख, एकनाथ नेहारे, शंकर मेश्राम, राजेंद्र बारसागडे, प्रीतम वाघमारे, सुनील शेरकुरे, गणेश देवी, सुमित सपडी, विक्रम रंगारी, सुनील वाघोसे, लक्ष्मण बाचलवार, दिपरत्न उपरे, राहुल चांदेकर, संजय कोयलवार, विकास माऊलीकर हे आमरण उपोषणास बसले आहेत. वाहन चालक बांधवांना वेतन वाढ, पी.एफ. आणि थकीत वेतन त्वरित देण्यात यावे या प्रमुख मागण्या आहेत.

आमरण उपोषण करीत असताना उपोषण कर्त्यांची प्रकृती हलविली किंवा त्यांच्या जीवाची काही हाणी झाल्यास सर्वस्वी जवाबदारी ही सीसीआर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचीच राहील असा इशारा भीम आर्मी जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र रायपुरे यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here