भिमगीताच्या माध्यमातुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समाजात रुजवा – आ. किशोर जोरगेवार

0
560

भिमगीताच्या माध्यमातुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समाजात रुजवा – आ. किशोर जोरगेवार

यंग चांदा ब्रिगेडच्या बहुजन आघाडीच्या वतीने भिमगीत कार्यक्रमाचे आयोजन

 

 

 

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला दिलेला देशोन्नतीचा विचार युवा पिढी पर्यंत पोहचला पाहीजे. त्याकाळात त्यांनी दलीत – सोशीतांच्या हक्कासाठी उभारलेल्या लढ्यामुळेच आज समान न्याय व्यवस्था निर्माण झाली आहे. त्यांचे हे योगदान समाजाच्या नेहमी स्मरणात राहिले पाहिजे. यासाठी भिमगीते हे ही सक्षम माध्यम असुन भिमगीताच्या माध्यमातुन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समाजात रुजवावे असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती निमित्त यंग चांदा ब्रिगेडच्या बहुजन आघाडीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात भिमगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरुन ते बोलत होते. तर सदर कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून भदन्त धम्मघोष मेता सहउद्घाटक म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटीचे अशोक घोटेकर तर प्रमुख वक्ते म्हणून प्रा. रवि कांबळे यांची उपस्थिती होती. तसेच या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून राजेश दहेगांवकर, यंग चांदा ब्रिगेडच्या बहुजन आघाडी शहर प्रमुख विमल कातकर, सामाजिक कार्यकर्त्या अनु दहेगांवकर, यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर यांची उपस्थिती होती.

 

यावेळी पूढे बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले कि, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या पवित्र दिक्षा भुमित आज हा भिमगीतांचा कार्यक्रम होत आहे. याच दिक्षाभुमिच्या सर्वांगीक विकासाठी आपण शासनाकडे सातत्याने पाठपूरावा करत आहोत. निवडणुकी नंतर झालेल्या पहिल्या अधिवेशनात मला बोलण्याची संधी मिळाली त्यावेळी मी काही ठरावीक विषयांवर बोललो त्यात दिक्षाभुमिच्या विकासाचाही मुद्दा होता. आपण पहिल्याच अधिवेशात दिक्षाभुमीच्या विकासाठी एकत्रीत 100 कोटी रुपये देण्याची मागणी केली होती. या मागणीचा आपल्या वतीने सातत्याने पाठपूरावाही सुरु आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांसाठी हे आस्थेचे स्थळ आहे. त्यामूळे येथे सर्व सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात ही आपली भुमिका आहे. मागील अनेक वर्षापासून या पवित्र दीक्षाभूमीच्या विकासाकडे दुर्लक्ष झाले. मात्र आता हि परिस्थिती बदलणार आहे. पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनीही दीक्षाभूमीच्या विकासासाठी २० कोटी रुपयांची घोषणा केली आहे. आणखी येथील कामांसाठी मोठा निधी आणण्याचे आमचे प्रयत्न असल्याचे ते यावेळी म्हणाले.

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती निमित्त यंग चांदा ब्रिगेडच्या बहुजन आघाडीच्या वतीने आयोजित आजच्या या भिमगीतच्या कार्यक्रमात सादर करण्यात आलेले भिमगीते हे डॉ. बाबासाहेबांची महान प्रतिमा दर्शविणारे आहे. शरिरात नवउर्जेचा संचार निर्णाण करणारे आहे. मात्र केवळ जयंती पूरत हे सिमीत राहता कामा नये डॉ.. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा प्रसार प्रचार करण्याचे काम यंग चांदा ब्रिगेडच्या बहुजन आघाडीच्या वतीने अविरतपणे सुरु राहिले पाहिजे अशी अपेक्षाही यावेळी त्यांनी व्यक्त केली.

 

यंग चांदा ब्रिगेडच्या बहुजन आघाडी शहर प्रमुख विमल कातकर यांनी सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. स्मिता भसारकर आणि टिना उराडे यांनी सुत्र संचालन तर निलीमा पोरेकर यांनी आभार प्रदर्शन केले. सदर कार्यक्रमाला नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here