जन्म भुमीचे ऋण फेडण्यासाठी पुरस्कार सोहळ्याचे आयोजन

0
584

जन्म भुमीचे ऋण फेडण्यासाठी पुरस्कार सोहळ्याचे आयोजन

विमाशीचे जिल्हाध्यक्ष केशवराव ठाकरे

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी गुणवंत विद्यार्थी पुरस्कार समारंभ

 

 

राजुरा : नौकरी निमित्ताने शहरात स्थायिक झालो असलो तरी ज्या गावात जन्मलो, त्या मातीत खेळलो, लहान वयाचा मोठा झालो, थोरांच्या संस्कारात वाढलो म्हणूनच मला यशाचे शिखर गाठता आले. ज्या शाळेने-गावाने मला शिक्षणाचा सुगंध दिला त्या गावाचे ऋण फेडण्यासाठी व येणाऱ्या नव्या पिढीला या मातीशी असलेल्या माझ्या ऋणानुबंधाची आठवण व्हावी यासाठी च मी दरवर्षी गुणवंत विद्यार्थी पुरस्कार समारंभ आयोजित करीत आहे असे गौरवोद्गार पिंपळगावचे सुपुत्र व विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष केशवराव ठाकरे यांनी जि.प.उच्च प्राथ.शाळा पिंपळगाव येथे आयोजित गुणवंत विद्यार्थी पुरस्कार वितरण सोहळ्याचे उद्घाटन पर भाषणात केले.

 

भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून (१४,एप्रिल) ओंकार नवचैतन्य शिक्षण मंडळांचे वतीने २०१९ते २०२२ या शैक्षणिक वर्षांतील वर्ग ८वी मधिल नऊ गुणवंत विद्यार्थ्यांचा शिल्ड, बाबासाहेब यांचे पुस्तक,शैक्ष.पॅड व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.तसेच कोरोना काळात ही शाळा बंद न ठेवता विद्यार्जन करणाऱ्या कोरोना योध्दा शिक्षकांचा शाल, बाबासाहेब आंबेडकर यांचे चरीत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.

 

समारंभाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बंडूजी बोढाले होते, प्रमुख अतिथी गोंडवाना शिक्षण संस्थेचे सचिव बापुराव मडावी, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे कार्यवाह श्रीहरी शेंडे, गावातील प्रतिष्ठित नागरिक राजकुमार पानघाटे,घुलारामजी वरारकर, विठ्ठलराव जोगी, नानाजी पाटील ठाकरे,खुशालराव गोहोकार, गणेश विधाते, मुख्याध्यापक अशोक गोरे व प्रतिष्ठित नागरिक हजर होते.
प्रमुख अतिथी बापुराव मडावी, श्रीहरी शेंडे, विठ्ठलराव जोगी यांनी विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले तर शाळेच्या विद्यार्थ्यांनी मनोगतातून डॉ. बाबासाहेबांच्या जिवनचरीत्रावर प्रकाश टाकला.

 

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे शिक्षक वृंद जी.बी. पाचभाई, कु.एम.के. उरकुडे, एन.एन.मडावी, कु. सी. डी. कोडमेलवार,कु.आर.एस.झाडे,सौ.चटप यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक मुख्याध्यापक अशोक गोरे यांनी केले, संचालन शाळेचे विद्यार्थी कु.हर्षदा बोबडे व नयन केळझरकर यांनी केले, आभार कु.श्रृतीका बोढाले हिने मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here