मयत अशोक वासुदेवराव उजवणे(मुद्रांक विक्रेता) यांच्या वारसास मुद्रांक विक्रेता परवाना देण्यास टाळाटाळ 

0
691

मयत अशोक वासुदेवराव उजवणे(मुद्रांक विक्रेता) यांच्या वारसास मुद्रांक विक्रेता परवाना देण्यास टाळाटाळ 

भारतीय नारी रक्षा संघटनेच्या वतिने पालकमंत्री,खासदार,आमदार,जिल्हाधिकारी व सह जिल्हा निबंधक यांना निवेदन 

 

यवतमाळ उपजिल्हा प्रतिनिधी ✍🏻संजय कारवटकर 

 

यवतमाळ -: राळेगाव येथील मुद्रांक विक्रेते अशोक वासुदेव उजवणे हे गेल्या ३५ वर्षांपासून राळेगाव येथील तहसील कार्यालयात मुद्रांक विक्रेता म्हणून कार्यरत होते.मात्र प्रभारी दुय्यम निबंधक छबू वरवाडे व मुद्रांक विक्रेता अशोक उजवणे यांच्यात काही कारणावरून वाद होऊन यांच्या मुद्रांक विक्रीचा परवाना नुतनीकरण गेल्या काही महिन्यांपासून प्रलंबित आहे व याच दरम्यान मुद्रांक विक्रेता अशोक उजवणे यांच्यावर दडपण आल्याने त्यांना दि.२३ एप्रिल २०२१ रोजी हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा यातच मृत्यू झाला आहे.

त्यामुळे अशोक उजवणे मुद्रांक विक्रेता यांच्या कुटुंबाचे उदरनिर्वाहाचे साधन बंद पडलेले आहे.करिता आपल्या सह जिल्हा निबंधक वर्ग-१ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे प्रलंबित असलेल्या नूतनीकरणाचा परवाना देण्यास विलंब होत असून हा विलंब अशोक उजवणे यांच्या पत्नी श्रीमती.वंदना अशोक उजवणे या विधवा महिलेवरील अन्याय असून अशाप्रकारे कोणत्याही महिलेवर होणारा अन्याय भारतीय नारी लक्षात संघटना कदापिही सहन करणार नाही करिता या प्रकाराकडे जातीने लक्ष घालून त्या महिलेला न्याय मिळवून द्यावा व प्रलंबित असलेल्या मुद्रांक विक्रेता परवाना नूतनीकरण करून मयत असलेले अशोक वासुदेवराव उजवणे यांच्या वारसास तो परवाना त्वरित देण्यात यावा अशी मागणी भारतीय नारी रक्षा संघटनेच्या वतिने पालकमंत्री श्री.संदिपान भुमरे,यवतमाळ-वाशिम मतदार संघाच्या खा.भावनाताई गवळी,राळेगाव विधानसभा आमदार श्री.अशोक उईके,जिल्हाधिकारी तसेच सह निबंधक यवतमाळ यांना दिलेल्या निवेदनातुन करण्यात आली आहे.निवेदन देतांना भारतीय नारी रक्षा संघटनेचे विनोद दोंदल,सुकांत वंजारी,वसंतराव कंगाले,दुर्गा पटेल,संतोषी राज वर्मा,मृतकाची पत्नी श्रीमती वंदना अशोक उजवणे,मुलगा श्रीजीत अशोक उजवणे,राज वर्मा,ईश्वर देऊळकर आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here