कोरपण्यात पार पडला कार्यकर्ता मेळावा

0
1026

कोरपण्यात पार पडला कार्यकर्ता मेळावा

●सेवालाल जयंती साजरी ●अनेक कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश

 

कोरपना/ताप्र. १६ फेब्रु. : संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून कोरपना तालुक्यातील गडचांदूर येथे वंचित बहुजन आघाडीचा तालुका स्तरीय कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला. वंबआ चंद्रपूरचे क्रियाशील जिल्हाध्यक्ष भूषण फुसे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. मेळाव्याच्या सुरवातीला संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली. काल वंचित बहुजन आघाडी तालुका शाखा कोरपना चे वतीने कोटावर कॉम्प्लेक्स गडचांदूर येथे कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी राज्य कार्यकारणीचे समन्वयक कुशल मेश्राम होते. त्यांनी यावेळी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी ज्या सूचना दिल्या त्या सूचनांचे कार्यकर्त्यांनी पालन करावे याविषयी मार्गदर्शन केले.

वंचित बहुजन आघाडी चंद्रपूर जिल्हाध्यक्ष भूषण फुसे यांनीओबीसी समाज तसेच इतर वंचित घटकांना पक्षासी कशा प्रकारे जोडता येईल याविषयी मार्गदर्शन केले. महासचिव धीरज बांबोडे येणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांना कसे सामोरे जाता येईल याविषयी विस्तृत मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाला उपस्थित प्रसिद्धीप्रमुख अमोल राऊत, कोरपना तालुका अध्यक्ष मधुकर चूनारकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर संचालन प्रा. डॉ. सोमाजी गोंडाने उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी यांनी केले. कार्यक्रमाला उपस्थित साजिद शेख, दिव्यकुमार बोरकर आणि तालुक्यातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी इतर पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला. यात रवी आदे, बुद्धभूषण जीवने (लोणी), धम्मा कापसे (सोनुर्ली), प्रशिक गणवीर (गडचांदूर) आणि शबाना मुसा शेख इत्यादींनी पक्ष प्रवेश घेतला.

येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या संदर्भात विचार विनिमय करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता विजय जीवने, विकी खाडे, साजिद शेख, राजेंद्र नळे, किशोर निमगडे, राहुल निरांजने आदींनी परिश्रम घेतले. तालुक्यातील बहुसंख्य लोक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here