बोधिसत्व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आम आदमी पार्टी बाबुपेठ तर्फे भव्य बाईक रॅली

0
531

बोधिसत्व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आम आदमी पार्टी बाबुपेठ तर्फे भव्य बाईक रॅली

 

 

चंद्रपूर – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्त बाबुपेठ मधून आप चे शहर सचिव राजू भाऊ कुडे यांच्या नेतृत्वात भव्य बाईक रॅली काढण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर अर्धकृती पुतळ्या पासून सिध्दार्थ नगर, लुंबिणि नगर, अंबेडकर नगर, सम्राट चौक, बुद्ध नगर, पंचशील चौक, ते गांधी चौक बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या पर्यंत भव्य बाईक रॅली काढत बाबासाहेब यांचा जयघोष करण्यात आला. तसेच प्रत्येक चौकात बाबासाहेब यांना वंदना करण्यात आली.

 

यावेळेस आप चे शहर सचिव यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरती प्रकाश टाकत आपले मनोगत व्यक्त केले सर्वधर्म समभाव, बंधुत्वता देशात कायम करायची असेल तर बाबासाहेब यांचे विचार जनमानसात रुजवणे गरजेचे आहे. याप्रसंगी उपस्थितमध्ये जिल्हा अध्यक्ष सुनिलभाऊ मुसळे, शहर सचिव राजू भाऊ कुडे, महिला जिल्हा उपाध्यक्ष जस्मिन शेख, महिला शहर संघटन मंत्री सुजाता ताई बोदेले, महिला शहर सचिव आरती ताई आगलावे, बाबुपेठ प्रभाग अध्यक्ष अनुप तेलतुंबडे, जयंत थूल, निखिल बारसागडे, जयदेव देवगडे, विरू भाऊ खोब्रागडे, कालिदास ओरके, तृषांत भाले, सुखदेव दरुंडे, सागर बोबडे, वैभव खंडाळे, निळकंठ खंडाळे, सुशांत धकाते, कार्तिक बल्लावार, कोमल कांबळे, सुनिल पचारे, रवींद्र रामटेके, प्रविण चूनारकर, इत्यादी उपस्थित होोतेे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here