रेल्वे कंत्राटदाराची मुजोरी ; शेतात उत्खनन

0
206

रेल्वे कंत्राटदाराची मुजोरी ; शेतात उत्खनन

शेतकऱ्याने केलेल्या कारवाई व नुकसाभरपाईच्या मागणीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष…

विरुर स्टे./राजुरा, १६ डिसें. : तेलंगणा सीमेलगत असलेल्या अन्नुर (अंतरगाव) येथील शेतकरी नामदेव नानू खेकारे यांच्या मालकीच्या भूमापन क्रमांक ७९ शेतातील माती मनमर्जीने रेल्वे कंत्राटदाराने उत्खनन केली. यामुळे शेतपीक व शेतजमिनीचे अतोनात नुकसान झाले आहे. याची माहिती तहसीलदार यांना देऊनही कारवाई न झाल्याने शेतकरी पुरता हतबल झाला असून कारवाई कोण करणार व झालेली नुकसान भरपाई कोण देईल हा यक्ष प्रश्न कृषी प्रधान देशात ऐरणीवर आला आहे.

सविस्तर वृत्त असे की, माकुडी रेल्वे स्टेशन येथे काम करत असलेला अजय नामक कंत्राटदार व त्यांचा सुपरवायझर स्वामी सालगमवार यांनी सदर शेतकऱ्याच्या शेतातून शेतकऱ्याला माहिती नसताना शेतातून दोन मोठे खड्डे खोदून मोठ्या प्रमाणात मातीचे उत्खनन केले. शेतजमिनीची नासधूस केली. जेसीबीच्या साहाय्याने शेतात एक खड्डा चाळीस मीटर लांब व एक मीटर रुंद, खोल तर दुसरा खड्डा चार मीटर रुंद व चार मीटर खोल खोदून ट्रॅक्टरच्या साहाय्याने माती नेऊन रस्ता बनवला आहे. यामुळे हि शेती शेतपिक घेण्यास अनुकूल नसून शेतीचे न भरून निघणारे अतोनात नुकसान झाले आहे. शेतातून वाहतूक होत असल्याने वाहने शेतात फसल्याने ठिकठिकाणी खड्डे पडले आहे. यामुळे शेती कशी कसावी हा शेतकऱ्यापुढे मोठा प्रश्न निर्माण झाले.

या घटनेची माहिती सदर शेतकऱ्याने तहसीलदार व पोलीस स्टेशन ला दिली आहे. मात्र यावर अजूनही कारवाई व नुकसान भरपाई शेतकऱ्यास मिळाली नाही. यामुळे न्याय मिळत नसेल तर शेतीचे झालेले नुकसान पाहता शेतकऱ्याने जगावे की मरावे हा प्रश्न पुढे आला आहे. पालकमंत्री यांनी विशेष लक्ष देऊन न्याय द्यावा अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here