वलांडी शिवारात वाहनचालकाचा खून करून मालवाहतूक टेम्पोसह मोबाईल इतर कागदपत्रे पळविले

0
555

वलांडी शिवारात वाहनचालकाचा खून करून मालवाहतूक टेम्पोसह मोबाईल इतर कागदपत्रे पळविले.

 

प्रतिनिधी✍🏻बाबूराव बोरोळे

लातूर :- जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील वलांडी शिवारात अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी मालवाहतूक टेम्पो चालक तथा मालक याचा दगडाने डोक्यात मारून खून केला व त्याच्या जवळील पिकप खिशातील कागदपत्रासह मोबाईल घेऊन फरार झाल्याची घटना मंगळवार दिनांक 15 जून रोजी रात्री साडेसात नंतर घडली. या प्रकरणी देवनी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

वलांडी शिवारातील सोमनाथ वीरभद्र उमाटे यांच्या शेतात बुधवार दिनांक सोळा जून रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास मृतदेह आढळून आल्याची घटना घडली. पोलिसांना घटनास्थळी मिळालेल्या विजिटिंग कार्ड वरून मृतदेह हा बालाजी शेषराव बनसोडे पाटील वय 35 वर्षे राहणार बिहारीपुर तालुका मुखेड जिल्हा नांदेड हल्ली मुक्काम बिदर गेट उदगीर यांचे असल्याचे माहितीतून समोर आले.

मयत बालाजी बनसोडे हे उदयगिरि टेम्पो सर्व्हिसेस या नावाने मालवाहतूक टेम्पो चा व्यवसाय करीत होते ते गेल्या सात वर्षापासून उदगीर येथे स्थायिक होते.

मंगळवार दिनांक 15 जून रोजी उदगीर येथून भाडे घेऊन ते निलंगा येथे गेले होते परत येताना वलांडी येथून रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास त्यांचे भाऊ राजेश पाटील यांच्याशी मोबाईलवरून शेवटचे बोलणे झाले त्यानंतर त्यांचा संपर्क बंद झाल्याची माहिती राजेश पाटील यांनी दिली दरम्यान रात्री साडे सात नंतर वलांडी शिवारात अज्ञात व्यक्तींनी दगडाने डोक्यात,पाठीमागील बाजूस, कपाळावर , चेहऱ्यावर गंभीर मारून खून केला व पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांच्याजवळील पिकप गाडी, कागदपत्रे व मोबाईल घेऊन फरार झाले. केवळ खिशात सापडलेल्या विझिटिंग कार्डवरून पोलिसांणी मायताची ओळख पटवली. याबाबतची फिर्याद मयता चा भाऊ राजेश पाटील वय 39 वर्षे राहणार बिहारीपुर तालुका मुखेड जिल्हा नांदेड यांनी दिल्यावरून देवणी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 184/ 2021 कलम 302, 201 भा द वि प्रमाणे अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव व पोलीस उपविभागीय अधिकारी कोल्हे यांनी देवनी येथे भेट देऊन घटनेची माहिती घेतली.. आरोपींच्या शोधासाठी एक पथक तयार करण्यात आले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सी एस कामठेवाढ ,पोलीस उपनिरीक्षक रणजित काथवटे,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक डमपलवाड, पोलीस कॉन्स्टेबल विनायक कांबळे,पोलीस नाईक सर्फराज गोलंदाज, राजपाल साळुंके हे करीत आहेत दरम्यान आरोपींच्या शोधासाठी पथके तयार करून रवाना करण्यात आली आहेत…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here