निराधार महिलेला मिळाला मदतीचा हात

0
220

निराधार महिलेला मिळाला मदतीचा हात

संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष तथा ग्राम संवाद सरपंच संघ महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष प्रमोद भगत यांचा स्तुत्य उपक्रम

 

चामोर्शी/गडचिरोली ✍️ सुखसागर झाडे
चामोर्शी तालुक्यातील महाराष्ट्राची काशी म्हणून जग प्रसिद्ध असलेले मार्कंडादेव येथील रहिवासी देवाजी सरपे यांचे आकस्मिक निधन झाल्याने त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नीवर दुखा:चे डोंगर कोसळले असल्याची बाब सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर, दिन दुबळ्या गोरगरिबांच्या एका हाकेला मदतीस धावून जाणारे समाजप्रिय कार्यकर्ते प्रमोद भगत यांच्या कानावर पडताच त्यांनी मार्कंडादेव येथे मृतकाच्या घरी जावुन भेट दिली.मृतकाच्या पत्नीस सांत्वन केले. त्यांच्या आर्थिक हलाखीच्या परिस्थितीचा आढावा घेत मदतीचा हात पुढे करीत आर्थिक मदत केली व मृतकाच्या पत्नीला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळवून देण्याची ग्वाही दिली.

यावेळी माजी सरपंच ललिता मरसकोल्हे, सामाजिक कार्यकर्ते मनोज हेजीब,शिवसेना तालुका उपप्रमुख अमित क्षिरसागर, उमाजी जुनघरे उपस्थित होते.

advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here