प्रकाश मेश्राम यांची महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समिती चंद्रपूर जिल्हा कार्याध्यक्ष पदी निवड

0
265

प्रकाश मेश्राम यांची महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समिती चंद्रपूर जिल्हा कार्याध्यक्ष पदी निवड

चंद्रपुर : नुकत्याच नागपूर येथे ६ऑगस्त २०२३ ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृह नागपूर येथे विदर्भ विभागीय कलावंत दिशादर्शक मेळावा ला विदर्भातील ३०० ते ४०० कलावंत उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष माणिक खोब्रागडे, उद्घाटक अभिनेते रमेश जाधव तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थापक अध्यक्ष गायक सोमनाथ गायकवाड नाशिक, महासचिव अड. श्याम खंदारे, विदर्भ प्रमुख मनोहर शहरे, सारिका उराडे, नागपूर शहर जयंत साठे उपस्थित होते.
प्रकाश मेश्राम हे ग्रामीण भागात राहत असून भजन, गायन, प्रबोधन, साहित्य कला, ईत्यादी सांस्कृतिक कला माध्यमातून महापुरुषांचे विचार प्रबोधन करीत आहेत. जुन्या रूढी परंपरांना मूठमाती देण्याबरोबरच शासनाच्या कल्याणकारी योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व कलावंतांना न्यायहक्क मिळवून देण्यासाठी संघर्षरत कार्य केल्याबद्दल व (वादळ निळ्या क्रांतीचे) प्रबोधनकार काम करीत असल्याबाबत ही निवड करण्यात आली. तरी त्यांचे विदर्भ प्रमुख मनोहर शहारे जिल्हाध्यक्ष अरविंद पाटील, महिला प्रमुख सारिका उराडे, जयंत साठे, प्रा. नरेंद्र मेश्राम आदींनी अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here