अभिष्टचिंतन सोहळ्यात पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा भव्य पक्षप्रवेश

0
513

अभिष्टचिंतन सोहळ्यात पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा भव्य पक्षप्रवेश

प्रतिनिधी प्रवीण मेश्राम
गडचांदुर :– आमदार सुभाष धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त गडचांदूर येथे काँग्रेस पक्षात अनेक जेष्ठांनी व युवकांनी काँग्रेस विचारधारेचा स्विकार करत आमदार सुभाषभाऊंच्या नेतृत्वात माजी नगरसेवक से.निवृत्त सहाय्यक वनसंरक्षक श्री. हरिभाऊ माणिकराव मोरे, आशिष नामवाड मानवहित लोकशाही पक्षाचे जिल्हाध्यक्ष, तुकाराम जाधव कोरपणा, पत्रकार कोवन काटकर अशा असंख्य कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला.
या प्रसंगी उद्घाटक म्हणून मार्गदर्शन करताना खासदार बाळुभाऊ धानोरकर म्हणाले की, आमदार सुभाष धोटे हे विकासाचं व्हिजन असणारं नेतृत्व आहे. सामाजिक, राजकीय व अन्य अनेक क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान आहे. क्षेत्राच्या विकासासाठी त्यांनी निरंतर कष्ट उपसले आहेत. कार्यकर्त्यांशी, क्षेत्रातील गोरगरीब जनतेशी त्यांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित आहेत. त्यामुळेच राजुरा विधानसभा मतदारसंघ काँग्रेसचा अभेद्य बालेकिल्ला व वाढता लोकांचा कल आहे. तर सत्काराला उत्तर देताना आमदार सुभाष धोटे यांनी कार्यकर्त्यांच्या प्रेम, जिव्हाळा आणि सहकार्याने आणि समस्त जनतेच्या आशिर्वादानेच आपण यशस्वी होऊ शकलो आहोत.पक्षात आलेल्या असंख्य कार्यकर्त्याचे स्वागत केले. काँग्रेस हा सर्वसामान्यांचा पक्ष आहे. पक्षात आलेल्यांना सन्मानजनक वागणूक मिळेल अशी ग्वाही दिली. आयुष्यभर जनसेवेसाठी आपण सर्वांना सोबत घेऊन काम करीत राहणार अशी ग्वाही दिली.
गडचांदुर शहर काँग्रेसमध्ये वाढती लोकप्रियता पाहुन कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here