घुग्घुस नगरपरिषद तर्फे अमृत महोत्सवानिमित्त माझी माती माझा देश कार्यक्रम संपन्न…

0
286

घुग्घुस नगरपरिषद तर्फे अमृत महोत्सवानिमित्त माझी माती माझा देश कार्यक्रम संपन्न…


आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या समारोपीय उपक्रमा अंतर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना प्रमाणे आज दिनांक 09/08/2023 बुधवार रोजी घुग्घुस नगरपरिषद मार्फत माझी माती माझा देश या अभियान अंतर्गत ‘ पंचप्राण शपथ’ व ‘वीरो का वंदन’ अभियान राबवण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमासाठी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री.जितेंद्र गादेवार, घुग्घूस चे पोलीस निरीक्षक आसिफ राजा शेख, ,प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. उंदीरवाडे,महावितरणचे उपकार्यकारी अभियंता श्री.नयन बटारकर , स.पो.नि.श्री साखरे, पोउनि.आमटे, घुग्घुस शहरातील ज्येष्ठ नागरीक संघ, स्वातंत्र्य सैनिक,दिवंगत स्वातंत्र्य सैनिक व नगर पालिका कर्मचारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमासाठी शहरातील मोठ्या संख्येने प्रतिष्ठित नागरिक व नगर परिषदेचे सर्व कर्मचारी हजर होते. सर्व उपस्थितानी पंचप्राण शपथ व माझी वसुंधरा शपथ घेतली. यावेळी बोलताना सर्व नागरिकांनी प्लास्टिकचा वापर पूर्णपणे टाळावा आणि ओला व सुका कचरा वेगवेगळा ठेवावा असे आवाहन मुख्याधिकारी यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here