डाँ सलीम अली यांना भारतरत्न द्या! : कवडू लोहकरे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कडे मागणी

0
360

डाँ सलीम अली यांना भारतरत्न द्या! : कवडू लोहकरे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कडे मागणी

विकास खोब्रागडे

चिमुर : पक्षी हा पर्यावरणाचा मौल्यवान घटक आहे. पक्ष्याशिवाय पर्यावरणाची तुलनाच करता येत नाही. ज्या महापुरुषांनी पक्षी संवर्धन, पक्षी अभ्यास, पक्षी सवयी, पक्ष्यांच्या जाती अशा विविध प्रकारच्या क्षेत्रात कायम स्वरूपात आपला वेगळा ठसा उमटवून आपले संपुर्ण जिवन पक्ष्यांसाठी अर्पण करणारे डाँ सलीम अली यांना भारतातील सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न देण्याची मागणी पक्षी प्रेमी कवडू लोहकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांचे कडे केली आहे.

पक्षी तज्ज्ञ डाँ सलीम अली यांनी “”द बुक अाँफ इंडीयन बर्ड्स”” , द फाँल आँफ अ स्प्ँरो नावाचे पुस्तक लिहिले. डाँ सलीम अली यांचे पक्षी विज्ञान व पर्यावरण या क्षेत्रात महत्त्वाचे योगदान राहीले. बालपणापासूनच डाँ सलीम अली यांना प़क्ष्याबद्दल आवड, जिज्ञासा, रुची असायची. त्यांनी पक्ष्यांच्या जिवनाबाबतस सखोल अध्ययन केले. विविध प्रकारच्या पक्ष्यांची ओळख करून घेतली. डाँ सलीम अली हे आद्य पक्षी शास्त्रज्ञ होते. त्यांनीच पक्षी निरीक्षण व संशोधनाचा पाया रचला. त्याच्या पासुनच पक्षी निरीक्षणास सुरुवात झाली.
डाँ सलीम अली यांचे मुळे नविन पक्षी प्रेमीना पक्षी संवर्धनाची प्रेरणा मिळाली आहे. पक्षी संवर्धनाची सुरुवात त्यांच्या पासुन झाली. पक्षी संवर्धन व पर्यावरण क्षेत्रात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. असे पक्षी तज्ञ डाँ सलीम अली यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल, मुख्यमंत्री यांचे कडे केली आहे

“पर्यावरणाशिवाय मानव जिवंत राहु शकत नाही.अश्या पक्षी संशोधन श्रेत्रात काम करणा-या व्यक्तीला अजुनही भारतरत्न पुरस्कार मिळाला नाही. ही दु:खाची बाब आहे. पक्षी संशोधन क्षेत्रात भारतरत्न पुरस्कार देण्याबाबत भारत सरकारने विचार करायला हवा.”

कवडू लोहकरे
पक्षी प्रेमी चिमुर

“” डाँ सलीम अली यांना ”बर्ड मँन इंडीया” या नावाने संबोधले जातात. भारत सरकारने १९५८ला पद्म भुषण, १९७६ ला पद्मविभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.””

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here