सोंडो येथील युवकांनी केली महात्मा ज्याेतिबा फुले पुण्यतिथी साजरी !

0
487

सोंडो येथील युवकांनी केली महात्मा ज्याेतिबा फुले पुण्यतिथी साजरी !
किरण घाटे

राजुरा
क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या १३० व्या स्मृतिदिनानिमित्त सत्यशोधक माळी समाज मंडळ सोंडो यांच्यावतीने ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात आले.यासाठी गावातील मंडळीनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्वच्छता जनजागृती केली.
त्याचबरोबर सायंकाळी सत्यशोधक माळी समाज तर्फे महात्मा जोतिबा फुले स्मृतिदिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाला गावातील मंडळीने उपस्थित राहून सहकार्य केले.

कार्यक्रमाच्या आरंभीच महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला दीप प्रज्वलन करून मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी सत्यशोधक माळी समाजाचे उपाध्यक्ष जयचंद्र शेंडे यांनी महात्मा जोतिबा फुले यांच्या जीवनावर आपल्या भाषणातुन प्रकाशज्याेत टाकुन गावकऱ्यांना मार्गदर्शन केले. त्याचबरोबर गावातील ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक ऋषिजी गेडाम आणि चंद्रशेखर मालखेडे यांनी आपले आपले मनाेगत व्यक्त केले

याच कार्यक्रमाचे औचित्य साधुन सत्यशोधक माळी समाजाचे उपाध्यक्ष जयचंद्र शेंडे यांनी ओबीसीची जातनिहाय जनगणना व्हावी यासाठी, गावात तरुण मित्राच्या सहकार्याने पाटी लावल्या आणि लोकांमध्ये ओबीसींबद्दल जागृती केली. त्यांना त्यांचा सविधानिक हक्क अधिकार मिळाला पाहिजे यासाठी पाटी लावा मोहीम गावात राबविली. यासाठी गावातील लोकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयचंद्र शेंडे यांनी केले. महात्मा फुले यांना आदरांजली वाहून कार्यक्रमाची सांगता झाली. उपस्थितांचे आभार गौरव मोहुर्ले यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here