सावधान! सिमेंट कंपनीत वाघाचा ठिय्या…

0
494

सावधान! सिमेंट कंपनीत वाघाचा ठिय्या…

आठदिवसापासून अल्ट्राटेक वसाहतीत वाघाचा वावर!

शेतातील काम करणे झाले अवघड!

 

कोरपना प्रतिनिधी
आवारपूरच्या अल्ट्राटेक सिमेंट कंपनीतील गेल्या आठ दिवसापासून सिमेंट कंपनीच्या वसाहतीत रोजच कामगारांना वाघाचे दर्शन होत आहे. दरम्यान येथील कर्मचारी अगदी सुरक्षित आहेत. परंतु या भागातील शेतकरीवर्ग मात्र भितीयुक्त वातावरणात आपले जीवन कंठीत घेऊन आहेत.

दरम्यान या भागात दिवस रात्र फिरणा-या वाघांचा बंदोबस्त करण्यास वनविभाग पूर्णता अपयशी ठरले आहे. मागील या आवारपूरातील गेल्या दोनवर्षापासून ह्या सिमेंट उद्योगात तिनदा (३) वाघोबा आला तर दोनदा वनविभागातर्फे त्यावेळी वाघोबाला पकडन्यात आले होते.

पण आजघडीला आठदिवसापासून हा वाघ येथेच असल्याने वनविभाग निव्वळ देखाव्यात असल्याचा स्पष्ट आरोप येथील नागरिकांनी केला आहे.

कोरपना आदिवासी बहुल तालुक्यातील बहुतांश गावातील सध्या कापूस वेचणी व गहू, हरभरा पेरणीचे कामे शेत शिवारात धडाक्यात सुरू आहे. त्यामुळे ग्रामीण परिसरातील महिलावर्ग आपल्या शेतात जात आहेत. पण आता शेतकऱ्यांच्या बांधावर वाघ येत असल्याची चर्चा आहे. सध्या हा वाघ विरूर पैनगंगा वेकोली परिसरात आल्याचे परत एकदा ऐकिवात आहे. हा वाघ आवारपूरच्या अल्ट्राटेक सिमेंट वसाहतीत आल्याचे कामगारांना दिसल्याने पुन्हा भिती निर्माण झाली असून शेतकऱ्यांनी शेतातील कामे करतांना सावध राहणे अत्यंत गरजेचे झाले आहे.

येथील वनविभाग आणि ग्रामपंचायतीने गावपातळीवर निदान एखादी दवंडी देण्याची आवश्यकता आहे. आता तर या वाघाच्या दहशतीमुळे शेतात जायचे कसे…? हा प्रश्न निर्माण झाला आहे.

त्याचबरोबर शेतकरी कुटुंबाचा उदरनिर्वाह म्हणून बकऱ्या, गाय, म्हशी आणि बैल पाळत असतात. त्यांना चराईसाठी शेत शिवारात‌ नित्य न्यावे लागते. कास्तकारांना आपला जीव मुठीत घेऊन हे काम करावे लागत आहे. आजच्या घडीला कोरपना तालुक्यातील विरूर गाडेगाव आणि आवारपूरच्या परिसरात या वाघाची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे घरचा व्यक्ती कधी घरी परत येतो, यांची कुटुंब प्रतिक्षा करीत असते.

वनविभागाने आता या बाबी कडे विशेष गंभीरतेने लक्ष देण्याची गरज आहे. पण तसे होतांना मात्र दिसत नाही. या क्षेत्रातील शेतकऱ्यांनी शेतात जातांना सावधगिरी बाळगण्याची गरज निर्माण झाली, हे मात्र तेव्हढेच खरे आहे…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here