हाथरस येथे प्रकरणाची निपक्षरित्या चौकशी करून दोषींना फाशीची शिक्षा द्या- माजी आमदार प्रा.राजू तिमांडे

0
341

हाथरस येथे प्रकरणाची निपक्षरित्या चौकशी करून दोषींना फाशीची शिक्षा द्या- माजी आमदार प्रा.राजू तिमांडे

अनंता वायसे

हिंगणघाट, 06 ऑक्टोबर : उत्तर प्रदेशातील हाथरस या खेडेगावात अमानवीय अत्याचारात पीडित मुलीच्या मृत्यूप्रकरणी निपक्षरित्या चौकशी करून दोषींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी आमदार प्रा राजू तिमांडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रपती यांना उपविभागीय अधिकारी मार्फत निवेदनाद्वारे करण्यात आली.
देशामध्ये महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे त्यानुषंगाने सरकारने खडक कायदा करावा व अत्याचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करून शिक्षा द्यावी.
हाथरस येथे अत्याचाराच्या घटनेत पीडित युवतीच्या मृत्यू झाल्यानंतर मृतदेहावर पोलिसांनी परस्पर अंत्यसंस्कार करून तिच्या कुटुंबियांना अंत्यदर्शना पासून दूर ठेवले ही बाब निंदनीय आहे .सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्यावी.सदर घटनेचा निषेध करतो.
हाथरस येथे दलित मुलीवर झालेला बलात्कार आणि खात्यातील पीडित कुटुंबीयांना भेटण्यासाठी जात असलेल्या खासदार राहुल गांधी व प्रियांका गांधी यांना रोखून धक्काबुक्की करण्यात आली हा लोकशाहीचा खून आहे या घटनेचा आम्ही निषेध करतो.
भारतात लोकशाही नांदत असून व्यक्ती स्वातंत्र असताना उत्तर प्रदेशमधील प्रशासन व पोलिसांनी लोकशाहीची लक्तरे वेशीवर टांगुन हुकूमशाहीचे साम्राज्य निर्माण केले आहे त्याचा निषेध…निषेध असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी व्यक्त केले व पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रपती यांना निवेदन पाठवण्यात आले त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हिंगणघाट विधानसभेचे अध्यक्ष व माजी सभापती संजय तपासे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here