पळसगांव येथे ताण-तणाव प्रशिक्षण कार्यशाळा

0
576

पळसगांव येथे ताण-तणाव प्रशिक्षण कार्यशाळा

चंद्रपुर वन प्रशासन ,विकास व व्यवस्थापन प्रबोधन चंद्रपुर यांच्या मार्फत उपक्रम

विकास खोब्रागडे

पळसगांव (पिपर्डा) ताडोबाच्या बफर झोन अंतर्गत वनविभागात काम करणाऱ्या पळसगांव व शिवणी वनविभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना दररोज खडतर सेवा करावी लागते. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांच्या जीवनात नेहमी ताणतणाव निर्माण होत असतो.वेक्तीमत्व विकास व ताण-तणावाचे व्यवस्थापन यां माध्यमातून पळसगांव येथे आज बुधवार (ता.३ मार्च )एक दिवसाचे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.पळसगांव वनपरिक्षेत्र कार्यालयात आयोजित या कार्यशाळेला पळसगांव येथील वनपरिक्षेत्र अधिकारी आर.एन थेमस्कर त्याचप्रमाणे शिवणी येथील वनपरिक्षेत्र अधिकारी तुपे साहेब यावेळी उपस्थित होते.सदर कार्यशाळा शिवणी व पळसगांव वनपरिक्षेत्र अंतर्गत कार्यरत अधिकारी-कर्मचारी सहभागी झाले होते.वन विभागात दैनंदिन कार्य करताना कर्मचाऱ्यांवर येणारा ताण शिवाय बफरच्या जंगल भागात काम करताना जाणवणारा त्रास यातून अनेकदा जीवन कठीण होत असल्याने अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये नैराश्याची भावना वाढीस लागत असते.कामाच्या अनियनितेमुळे जेवण आणि झोप दोघांमधील संतुलन नसल्याने कर्मचारी आरोग्य दिवसेंदिवस बिघडत चालले आहे. याचा परिणाम त्यांच्या स्वास्थ्यावर होत असून रक्तदाब, मधुमेह आणि मानसिक आजारांचे प्रमाण वाढत चालले आहे. यामुळे कार्यालयातील ताणाचा परिणाम कौटुंबिक जीवनावर होत आहे. यातून मुक्ती कशी मिळवावी, यासाठी ताण-तणाव व्यवस्थापनासंबंधी कर्मचाऱ्यांना चंद्रपुर वन प्रशासन प्रबोधणी मार्फत मार्गदर्शन करण्यात आले .श्री जयेश देशमुख यांनी आपल्या मार्गदर्शनात कर्मचाऱ्यांनी वागणे, बोलणे, व्यायाम,योग या माध्यमातून तणाव कसे कमी करायचे, याविषयी उपस्थितांशी संवाद साधला.यावेळी बोलताना देशमुख यांनी मानसिक तणावग्रस्त कर्मचाऱ्यांनी भूतकाळ आणि भविष्य काळातील गोष्टींवर भर न देता वर्तमानात जगणे शिकले पाहिजे असे सांगून नाते संबंधात दुरावा निर्माण होणारी परिस्थिती उत्पन्न न होऊ देण्याचा सल्ला यावेळी उपस्थित वनविभातील कर्मचाऱ्यांना दिला.कौटुंबिक नातेसंबध आणि अधिकाऱ्यांशी नाते कसे असावे,याविषयी श्री.जयेश देशमुख व्यखाते यांनी उपस्थितांचे सखोल मार्गदर्शन केले,या वेळी महानंदा वाकडे,प्रबोधन अधिकारी, सूरजागडे वनपाल व दांडेकर वनरक्षक यांनी सदर कार्यक्रम आयोजित करण्यात मोलाची कामगिरी बजावली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here