पत्रकार “दिवाळी भेट” न्यायालयाच्या मार्गावर…

208

पत्रकार “दिवाळी भेट” न्यायालयाच्या मार्गावर…

 

दिवाळी संपली.. मात्र मुंबईतील पत्रकारांना मिळालेल्या “दिवाळी भेटीचं” कवीत्व संपलेलं नाही.. हा विषय आता न्यायालयात जाण्याच्या मार्गावरय.. “इंडियन एक्स्प्रेस” न्यायालयाचे दरवाजे ठोठावत आहे.. तुम्ही म्हणाल एक्स्प्रेस ग्रुपचा या विषयाशी संबंध काय? आहे संबंध.. असं सांगितलं जातंय की, मुंबईतील ज्या मोजक्या संपादकांना सागरवर दिवाळी फराळाचं आवतणं होतं त्यात लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर होते.. गिरीश कुबेर ‘मेघदूत’ गेलेही.. एवढंच नव्हे तर अन्य पत्रकारांबरोबरच गिरीश कुबेर यांनी देखील दिवाळी भेट घेतल्याचा Sprouts News चा दावा..

बातमीत ही त्यांनी तसं म्हटलंय.. यावर .”Sprouts ने खोडसाळपणे असत्य आणि अश्लाघ्य बातमी प्रसृत करून आपली बदनामी केली” असा कुबेर आणि एक्स्प्रेस ग्रुपचा दावा.. त्यामुळे इंडियन एक्स्प्रेस ग्रुपने Sprouts ला १०० कोटी रूपयांची नोटीस पाठविली आहे.

“बिनशर्त माफी मागा अन्यथा अब्रूनुकसानीच्या दाव्यास सामोरं जावं लागेल”.. असं नोटिशीत म्हटलं आहे.. मात्र” आपण दिवाळी भेट घेतलीच नाही” असं गिरीश कुबेर यांनी यासंबंधीच्या बातमीत कोठेही म्हटलेलं नाही.. नोटिशी संदर्भातली बातमी ४ नोव्हेंबरच्या “लोकसत्ता” मध्ये छापली गेलीय.. दुसरीकडे Sprouts आणि ज्यांनी ही बातमी छापली ते धडाडीचे पत्रकार उन्मेष गुजराथी आपल्या बातमीवर ठाम आहेत.. त्यामुळे हा वाद आता न्यायालयात जाऊ शकतो.. ..

दैनिकाच्या विरोधात अब्रूनुकसानीचे दावे दाखल होतच असतात.. मात्र एका दैनिकानं दुसरया दैनिकाच्या विरोधात अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्याची किंवा तशी नोटीस पाठविण्याची कदाचीत Facebook ही पहिलीच वेळ असू शकते.. नोटीस तर पाठवलीय पण एक्स्प्रेस ग्रुप गिरीश कुबेर यांच्यासाठी दहा कोटींचा भुर्दंड स्वीकारेल का? असं वाटत नाही..केवळ हा भिती दाखविण्याचा प्रकार असू शकतो.. कारण १०० कोटींचा दावा दाखल करताना दाव्याच्या रक्कमेच्या दहा टक्के म्हणजे १० कोटींची रक्कम न्यायालयात जमा करावी लागते..ती एक्स्प्रेस समुह भरेल? कोणीच भरत नाही.. त्यामुळं केवळ नोटिसा पाठवल्या जातात.. पुढं या नोटिशींचं काय होतं कुणाला कळतही नाही..

गिरीश कुबेर यांच्यावतीने ही नोटीस दिली जावी हा ही एक विनोद .. कुबेर आपल्या अग्रलेखातून आणि स्तंभातून अनेकांवर जहरी टीका करीत असतात.. वातानुकूलित मनोरयात बसून कुबेर चळवळींना कायम विरोध करतात .. शेतकरी तर त्यांचा टिकेचा आवडता विषय.. पत्रकार संरक्षण कायदा आणि पत्रकार पेन्शन योजनेलाही या महोदयाचां विरोध होता आणि आहे.. “पत्रकारांना असा स्वतंत्र दर्जा देता कामा नये” असं त्यांचं म्हणणं असतं.. तशी मांडणी त्यांनी आपल्या अग्रलेखातून वारंवार केलेली आहे..त्यांना पेन्शनची गरज नसेलही पण राज्यात असे अनेक तत्त्वनिष्ठ पत्रकार आहेत की त्यांनी कधीच कुठल्या “लाख मोलाच्या” भेटी स्वीकारलेल्या नाहीत.. त्यामुळे राज्यातील बहुतेक पत्रकार आमच्या चळवळीबरोबर होते..परिणामतः आम्ही यशस्वी झालो.. कुबेर यांच्या नाकावर टिच्चून राज्यातील पत्रकारांनी दोन्ही मागण्या पदरात पाडून घेतल्या…

गिरीश कुबेर यांचा उल्लेख येताच सर्वात प्रथम आठवतो तो त्यांनी मागे घेतलेला अग्रलेख… “असंतांचे संत” हा अग्रलेख मागे घेण्याचा विक्रम त्यांच्या नावावर नोंदविला गेलेला आहे.. (तो मोडला जाण्याची शक्यता ही नाही) आपल्या अग्रलेखातली एक ओळ ही बदलण्यास विरोध करणारया आणि त्यासाठी राजीनामा व्यवस्थापनाच्या तोंडावर भिरकविणयाची धमक दाखविलेल्या संपादकांची परंपरा असलेल्या महाराष्ट्रात गिरीश कुबेर यांनी थेट अग्रलेख मागे घेऊन आपली नोकरी वाचविली होती…तमाम संपादकांसाठी हा विषय लाजीरवाणा आणि खाली मान घालायला लावणारा होता..अशा संपादक महोदयांची म्हणे एका बातमीने बदनामी झाली..

उन्मेष गुजराथी हे शोध पत्रकारिता क्षेत्रातील एक आघाडीचे नाव आहे.. लेखणीच्या माध्यमातून त्यांनी अनेक दांभिकांचा भांडाफोड केलेला आहे.. .. त्याची किंमतही त्यांनी मोजलेली आहे.. तरीही ते निर्धाराने, बेडरपणे पत्रकारिता करीत असतात .. अशा पत्रकाराला १०० कोटीची नोटीस पाठवून त्याचे मानसिक खच्चीकरण करण्याचा आणि त्यांचा आवाज बंद करण्याचा हा प्रयत्न आहे..या लढ्यात आम्ही उन्मेष गुजराथी यांच्या समवेत आहोत असे मत/विचार श्री एस. एम. देशमुख, ज्येष्ठ पत्रकार यांनी मांडले.

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा सलाहगार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार

सहकार्य: उन्मेष गुजराथी
स्प्राऊट्स ब्रँड स्टोरी

advt