जालना तालुक्यातील विरेगाव या ग्रामपंचायतीमध्ये दि 22/07/2020 रोजी गावामध्ये साथीच्या आजाराविषयी जनजागृती करण्यात आली. यात हिवताप, डेंग्यू, मलेरिया इ. किटकजन्य् आजार हे डासामार्फत पसरतात. या डासाची उत्प्त्ती ही राजंण्,माठ,हौद,टायर इ. मध्ये साचलेल्या पाण्यात होते. त्यामुळे प्रत्येकाने आठवडयातील एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा, असे आवाहन करण्यात आले. विरेगावात दि 22/07/2020 रोजी कोरडा दिवस पाळण्यात आला. तसेच सदध्या कोरोना साथीमुळे नियमीत मास्कचा वापर करावा आणि सामाजिक अंतर पाळावे असे आवाहन करण्यात आले. यावेळी सरपंच श्रीमती शालिनी सर्जेराव कदम, पंचायत समिती सदस्य् श्रीमती सरस्वती दत्ता खरात, श्री गणेश कदम(मा.पं.स.सदस्य्), ग्रामसेवक श्री एस एम जोशी, आरोग्यसेवक श्री एम.एम.डहाळे व सर्व ग्रामपंचायत सदस्य् विरेगाव यांनी आवाहन केले.