‘ज्ञानज्योत’ कथा-कविता संग्रहाचे प्रकाशन

0
23

‘ज्ञानज्योत’ कथा-कविता संग्रहाचे प्रकाशन

शालेय विद्यार्थ्यांचा साहित्यिक आविष्कार

आवाळपूर :- सतीश जमदाडे

कोरपना पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या जि.प. उच्च प्राथमिक शाळा, सोनूर्ली येथील विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या कथा आणि कवितांचा संग्रह ‘ज्ञानज्योत’या पुस्तकाच्या स्वरूपात प्रकाशित करण्यात आला. वडगांव येथे केंद्र सोनूर्ली व केंद्र वनसडी यांची संयुक्त शिक्षण परिषद घेण्यात आली या शिक्षण परिषदेत या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या या रचनांमध्ये त्यांच्या भावना, कल्पना आणि सर्जनशीलतेचा सुंदर संगम पहायला मिळतो. या संग्रहात १६ कविता आणि २७ कथा व छोटे लेख यांचा समावेश असून, विद्यार्थ्यांनी स्वतः रेखाटलेली चित्रेही पुस्तकाला सजवतात. प्रकाशन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून कल्याण जोगदंड शिक्षण विस्तार अधिकारी, विलास देवाळकर केंद्रप्रमुख व सखाराम परचाके मुख्याध्यापक वडगांव हे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले, तर विद्यार्थ्यांनी आपल्या रचनांचे सादरीकरणही केले. या कार्यक्रमाला पालक व बिटातील इतर शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सोनूर्ली शाळेचे मुख्याध्यापक बाळा बोढे म्हणाले, “हा संग्रह म्हणजे विद्यार्थ्यांच्या साहित्यिक प्रतिभेचा एक आगळावेगळा ठेवा आहे. त्यांना लेखनाचे व्यासपीठ मिळावे आणि त्यांचा आत्मविश्वास वाढावा, हा आमचा हेतू आहे.”
‘ज्ञानज्योत’ या संग्रहाच्या निर्मितीसाठी विशेष परिश्रम घेणारे शिक्षक सुनिल अलोने संवाद साधतांना सांगितले की, “विद्यार्थ्यांनी तयार केलेला हा कथा, कविता आणि चित्रांचा संग्रह पाहून मला खूप आनंद आणि अभिमान वाटतो. विद्यार्थ्यांच्या प्रत्येक कथेतून एक नवं विश्व उलगडतं, प्रत्येक कवितेतून भावनांचा सुंदर झरा वाहतो आणि प्रत्येक चित्रातून रंगांचं एक जादुई नृत्य दिसतं. हा संग्रह त्यांच्या अफाट कल्पनाशक्तीचा आणि मेहनतीचा दाखला आहे.”
ज्ञानज्योत संग्रहातील व्यकरणाच्या चुका शोधून त्याला अधिक प्रभावी करण्याचे कार्य शिक्षिका मेनका मुंडे यांनी केले. या संग्रहासाठी शिक्षक विजय राऊत, शिक्षिका प्रभावती हिरादेवे व शिक्षणप्रेमी पल्लवी कांबळे यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here