ग्रामपंचायत येरूर येथे बॉडी फ्रीजर वितरण कार्यक्रमाचे आयोजन
घुग्घूस : धारीवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड ,चंद्रपूर व पहेल मल्टीपर्पज सोसायटी, चंद्रपूर सामाजिक दायित्व विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने देवेश कुमार ( मुख्य महाप्रबंधक धारीवाल ) यांच्या मार्गदर्शनातुन गावातल्या लोकांना येणाऱ्या समस्या लक्षात घेता एखादा व्यक्ती गावातील मरण पावला की . त्याचे नातेवाईक इथपर्यंत त्याला ठेवण्यासाठी घरच्यांची होणारी धडपड ही ग्रामीण भाग असल्यामुळे जाणवत होती. ही धडपड लक्षात घेता ग्रामपंचायतीत येरुर यांनी कंपनीकडे प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावना जराही विलंब न करता धारिवाल कंपनीने व पहेल संस्थेने पुढाकार घेऊन ग्रामपंचायत येरूर येथे बॉडी फ्रिजर वितरित केले.
या उपक्रमाचा उद्देश गावातील नागरी सेवा सुविधा वृद्धिंगत करणे व सामाजिक बांधिलकी जपणे हा होता. या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून मा. पुंडलिक वानवे उप महाप्रबंधक धारीवाल तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अनिष नायर मुख्य व्यवस्थापक धारीवाल, धिरज ताटेवार उपव्यवस्थापक धारिवाल, रमेश बुचे (ग्रामपंचायत सदस्य), सौ. गीता कळसकर मॅडम, नामदेव बोरकुटे ग्रामपंचायत सदस्य येरूर) यांची उपस्थित होती. या कार्यक्रमाचे संचालन अंजु काकडे यांनी केले तर आभार सपना येरगुडे यांनी मानले कार्यक्रम उत्तमरीत्या पार पाडण्यासाठी दिनेश कामटवार यांनी सहकार्य केले.