भटाळी गावातील पुलियाचे व रस्त्याचे काम 7 दिवसात सुरू करा अन्यथा नदी पात्रात जल आंदोलन करण्यात येईल…

221

भटाळी गावातील पुलियाचे व रस्त्याचे काम 7 दिवसात सुरू करा अन्यथा नदी पात्रात जल आंदोलन करण्यात येईल…

ग्राप सदस्य विकास पेंद्राम, सामाजिक कार्यकर्ते सचिन उपरे यांचा इशारा

 

चंद्रपूर : भटाळी गावाजवळून वाहणार्‍या ईरई नदीवरील पुलाचे व मुख्य रस्त्याचे बंद असलेले काम त्वरित सुरू करण्यात यावे. मागील काही वर्षांपासून भटाळी पूलीयाचे काम कासव गतीने सुरू आहे. आता तर पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे ज्या पुलाचे बांधकाम सुरू नाही त्याच नदी पात्राच्या मधोमध जल आंदोलन केले जाणार असे निवेदन दिनांक ११/११/२०२२ ला गट ग्रा.पं. पायली भटाडी चे सदस्य विकास पेंदराम तसेच सामाजिक कार्यकर्ते सचिन उपरे यांनी कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग क्रमांक -१, चंद्रपूर येथे निवेदनाद्वारे विनंती केलेली आहे.

या पुलियाचे काम कासव गतीने किंवा थांबलेल्या कामामुळे अनेक लोक या नदिपात्रात वाहून गेले. त्यामुळे या पुलियाचे लवकरात काम सुरू करा तसेच भटाळी येथील मुख्य रस्त्याचे सुद्धा अर्धवट काम पूर्ण तातडीने पूर्ण करा. इरई नदीवरील पुलाचे बांधकाम ७ दिवसांत सूरू केले नाही तर जल आंदोलनादवारे सत्याग्रह करण्यात येणार असल्याचे निवेदनाद्वारे कळविण्यात आले आहे. यावेळी लवकरात लवकर काम सुरू करू अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी निवेदनकर्त्यांना दिली.

advt