वाचनालयाला विरोध करणाऱ्या विकृतांचे षडयंत्र पँथरने धुडकावले

0
435

वाचनालयाला विरोध करणाऱ्या विकृतांचे षडयंत्र पँथरने धुडकावले

● शेकडो जातीयवादी जमावाला पँथरची डरकाळी

● पँथर च्या उपस्थितीत वाचनायाचे काम रातोरात पुर्ण

 

नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथील सोनेझरी वॉर्डात डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय तयार होत असतांना त्याच वॉर्डातील विकृतां कडून वाचनालय इमारत बांधकाम होऊ नये म्हणून वारंवार रोखल्या जात होते. या विरोधात ऑल इंडिया पँथर ची वाघीण भिमकन्या व रश्मी गेडाम व त्यांच्या सहकारी सविता खोब्रागडे, सुनीता येवले, प्रतिक्षा झोडोपे, माला येवले यांनी सातत्याने लढा देत वाचनालयाचे बांधकाम सुरू ठेवले होते. मात्र विकृतांचा विरोध सतत वाढतांना बघता ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष, महाराष्ट्राचे ढाण्या वाघ दिपकभाई केदार यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर जिल्हाध्यक्ष रुपेश निमसरकार, नागपूर जिल्हाध्यक्ष विशाल तांबे यांनी चंद्रपूर व नागपूर जिल्ह्यातील भिम पँथर घेऊन उमरेड मध्ये दाखल झाले. तेथील सर्व परिस्थिती जाणून घेऊन वाचनालयाचे अपुरे असलेले काम पुन्हा ताबडतोब सुरवात केले. हे वास्तव चित्र जातीयवादी, मनुवादी विकृत यांना खपले नाही, जवळपास रात्रीच्या नऊ दहा वाजताच्या दरम्यान शेकडोंचा जमाव वाचनालयाचे बांधकाम रोखण्यास वाचनालयाकडे धडकला, मात्र या जमावाला पँथर सेना न घाबरता जशास तसे बंड करण्यास सुरुवात केली, शेकडोंच्या जमावाला चंद्रपूर जिल्हाध्यक्ष रुपेश निमसरकार व नागपूर जिल्हाध्यक्ष विशाल तांबे यांनी खुले चँलेज करीत आमनेसामने लढण्याचे आव्हान केले, पँथर ची ही आक्रमक भूमिका बघता पोलीस प्रशासन शेकडोंने उपस्थित राहून विकृतांचा निच डाव हाणून पाडला व वाचनालयाचे बांधकाम पुर्ण करा असे आवाहन पोलीस प्रशासन व नगरप्रशासनाने सांगितले त्यांच्या उपस्थितीत वाचनालयाचे बांधकाम पुर्ण केले.

या लढ्यात ऑल इंडिया पँथर सेनेला मोठे यश आले, पँथर संघटनेचे चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्हा सल्लागार संतोष डांगे, सिंदेवाही तालुका अध्यक्ष आक्रोश खोब्रागडे, सुनील गेडाम, बांबोळे साहेब, विरेंद्र मेश्राम, नागपूर जिल्ह्यातील पँथर संजय पाटील, गोलू सुखदेवे, आयुष्य डोंगरे, यश कुंभारे आदींनी खांद्याला खांदा लाउन मर मिटेंगे मनत आंदोलनात ताकदीने उभे राहिले. या सर्वांच्या लढ्याला मोठे यश मिळाले असून उमरेड शहरातील विकृतांचे पँथर सेनेच्या नावाने धाबे दणाणले आहेत. येणाऱ्या काळात ऑल इंडिया पँथर सेना उमरेड शहरात ताकदीने उभी राहणार न्याय हक्कासाठी सदैव पुढे येईल यांचा विश्वास आंबेडकर जनतेत पोहचला आहे. सर्व स्तरातून ऑल इंडिया पँथर सेनेचे अभिनंदन करीत धन्यवाद मानल्या जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here