महाराष्ट्र ऑलम्पिक मान्यताप्राप्त महाराष्ट्र कराटे असोसिएशनच्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्याला ९ सुवर्णासह १ रौप्य व ४ कांस्य पदक

0
1022

महाराष्ट्र ऑलम्पिक मान्यताप्राप्त महाराष्ट्र कराटे असोसिएशनच्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्याला ९ सुवर्णासह १ रौप्य व ४ कांस्य पदक

 

 

पंकज रामटेके / विशेष प्रतिनिधी

दिनांक २६ ते २८ दरम्यान महाराष्ट्र कराटे असोसिएशनच्या वतीने ४३ व्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन संघटनेचे चेअरमन सेंसाई संदिप साळवी , महासचिव सेंसाई जॉजी इबराहिम तसेच खजिनदार सेंसाई रत्नकांत वंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली बालेवाडी आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलमधील बॉक्सिंग हॉलमध्ये करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी चंद्रपूर जिल्हास्तरिय निवड चाचणी घेण्यात आली होती त्यामधे २५ खेळाडूंची निवड करण्यात आली होती. या २५ खेळाडूंनी राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होत पदकांची लूट केली. यात ९ खेळाडूंनी प्रथम क्रमांक मिळवून राष्ट्रीय स्पर्धेसाठी आपली जागा निश्चित केली.
सर्वांचे लाडके नेतृत्व आदरनीय अजितदादा पवार अध्यक्ष असलेल्या महाराष्ट्र ऑलि्पिक असोसिएशने कराटे खेळासाठी महाराष्ट्र ऑलम्पिक असोसिएशनचे महासचिव माननीय नारायण शिरगावकर साहेब यांच्यावतीने नुकतीच मान्यताप्राप्त युनिट म्हणून महाराष्ट्र कराटे असोसिएशनला मान्यता देण्यात आली आहे, त्याचा कराटे खेळाडूंच्या चांगल्या भविष्यासाठी फायदा होणार आहे असे संघटनेचे चेअरमन यांनी त्यांच्या उद्घाटनाच्या भाषणात प्रतिपादन केले.
चंद्रपूर च्या २५ खेळाडूंनी दोन दिवस झालेल्या ६ वर्ष ते १४ वर्षाआतील तसेच १८ वर्षांवरील खुल्या अश्या विविध वय व वजन गटामध्ये खालील प्रमाणे मेडल मिळवलेले आहेत.
१)श्रीजा सहारे- गोल्ड मेडल
२)यश नगराले-गोल्ड मेडल
३)पूर्व दिलीप शिरोया- गोल्ड मेडल
४)आर्यश संजय उपाध्ये -गोल्ड मेडल
५)वेदांत चोप्पावार -गोल्ड मेडल
६)मनमीत वामन हरडे -गोल्ड मेडल
७)वृषभ बामनकर -गोल्ड मेडल
८)अंकुश राजकुमार मुलेवार -गोल्ड मेडल
९)मोहम्मद मुहाफिज सिद्दीकी -गोल्ड मेडल
१०)तमस संतोष वासेकर -सिल्वर मेडल
११)विधि कोटकोंडावर -ब्रॉन्ज मेडल
१२)आतिश चेतन रोड़े -ब्रॉन्ज मेडल
१३)शोर्य विवेक बोढे -ब्रॉन्ज मेडल
१४)शोर्य टाले -ब्रॉन्ज मेडल.
१५) माहिन खान – ब्राँझ मेडल
तसेच मारिया हुसैन, यशस्वी येनुग्वार, स्वरा वासलवार, भुवनेश्वरी नागोसे, दिव्या नरड, सिमरन खोबरागड़े, ऋचा कोसे, शाहब सकुईबुद्दीन, यश कलगटवार, अध्यन क्षीरसागर, वेदांत सोनकुसरे यांनी सुद्धा आपली प्रतिभा दाखवत स्पर्धेत छाप सोडली पण यांना पदकापासून वंचित राहावे लागले.
सर्व खेळाडूंनी आपल्या यशाचे श्रेय संस्थेचे पदाधिकारी सेंसाई योगेश चौहान, सेंसाई किशोर मोहूर्ले तथा प्रमुख प्रशिक्षक सेंसई विनय बोढे, सेंसाई रवींद्र मुक्के,सेंसाई इम्रान खान, सेंसाई निलेश गेडाम, सेंसाई शहबाझ शेख, नरेश थटाल, मनजीत मंडल, कु. साक्षी गुरणुले यांना दिले.
कराटे खेळाच्या शुभचिंतक तथा मार्गदर्शक शरयू फाऊंडेशनच्या अध्यक्षा शर्मिलाताई पवार व चंद्रपूर जिल्ह्यामधील सर्व क्रीडा प्रेमीच्या वतीने खेळाडू व प्रशिक्षकावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here