गडचांदूर परिसरात 21 गावात एक गाव एक गणपती

0
556

गडचांदूर परिसरात 21 गावात एक गाव एक गणपती
गणेशोत्सवनिमित्ताने पोलिसांचा तगडा बंदोबस्त

 

प्रवीण मेश्राम, कोरपना
गडचांदूर पोलीस स्टेशन हद्दीतील 21 गावात एक गाव एक गणपती बसले आहे. गडचांदूर शहरात 21 ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा ने श्री गणेशाची प्रतिष्ठापना केली आहे.शहरात 305 घरगुती गणेशाची मूर्ती ची प्रतिष्ठापना केली आहे, ग्रामीण भागात 39 गणेशोत्सव मंडळ ने श्री ची प्रतिष्ठापना केली आहे. गणेश उत्सव दरम्यान गडचांदूर पोलिसांकडून गावागावात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला.

अनेक गणेश मंडळांनी आकर्षक देखावे साकारले आहे. यामध्ये सामाजिक आशयाच्या प्रतिकृती साकारण्यात आल्या आहे. विविध धार्मिक तसेच राष्ट्रीय कार्यक्रमाचे आयोजन करून गणेश उत्सव उत्साहात साजरा करण्यात येतो आहे.
तसेच अनेक गावात घराघरात गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. या गणेश उत्सवाच्या पर्वावर उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सत्यजित आमले, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे यांनी ठाणे हद्दीतील प्रत्येक गावात आढावा घेऊन गणेश उत्सव शांततेत पार पडण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here