वडगाव प्रभागातील निवासी परिसरातील दारू दुकाने स्थानांतरीत करा- युवा जिल्हाध्यक्ष मयुर राईकवार ची मागणी

0
386

वडगाव प्रभागातील निवासी परिसरातील दारू दुकाने स्थानांतरीत करा- युवा जिल्हाध्यक्ष मयुर राईकवार ची मागणी

 

चंद्रपुर जिल्ह्यातील दारू बंदी उठल्या नंतर राज्य उत्पादन शुल्क विभागा तर्फे बिनबोभाटपणे कागदपत्रांची पूर्तता न करता अनेक ठिकाणी दारू,बियर शॉपी चे दुकाने उघडन्याचे लायसन्स सर्रास पणे देण्यात येत आहे. पण आता दारू विक्रेत्याचा मोर्चा आता निवासी परिसरा कड़े वळला आहे दारू बियर शॉपी उघडन्याचे प्रमाण वाढले आहे. त्याच संबंधित वडगाव प्रभागातील आकाशवाणी रोड वरील अमृतगंगा कॉम्प्लेक्स मधिल अनूप बियर शॉपी व एम.बि. बियर शॉपी एन्ड वाइन शॉपी ही दुकाने रहिवासी परिसरात उघडल्यामुळे दारू पिणाऱ्या ची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे अगोदर रहिवासी परिसरात येथील नागरिक मनमोकळे प्रमाणे फिरण्यास वावरण्यास मोकळे होते पण आता या दारू दुकानामुळे दारू पिणारे त्याच ठिकाणी दारू पितात आजुबाजूच्या परिसरात जिथे जागा मिळेल तिथे दारू पितात रस्त्यावर दारुच्या बॉटल च्या काचा फोडतात आजूबाजूच्या लोकांना घाण घाण शिवीगाळ करतात या संपूर्ण परिस्थिति मुळे परिसरातील वातावरण घृणास्पद झालेले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी आम आदमी पक्षाचे युवा जिल्हाध्यक्ष मयुर राईकवार यांच्याकड़े लिखित तक्रार अर्ज केला. याची दखल घेत आज आम आदमी पक्षाचे शिष्टमंडळ सोबत परिसरातील नागरिकांनी राज्य उत्पादन शुल्क चंद्रपुर विभागाचे अधीक्षक यांची भेट घेत सदर बियर शॉपी स्थानांतरित करण्याचे आदेश काढावे अशी मागणी करणारे निवेदन देण्यात आले अन्यथा कुठलाही अपघात झाल्यास दारू पिणाऱ्या मुळे घटना घडल्यास झाल्यास आपला विभाग जबाबदार राहील. सदरील पुढील पंधरा दिवसात यावर निर्णय घ्यावा अन्यथा आम आदमी पक्षातर्फे परिसरातील नागरिकांना घेऊन एक मोठे जनआंदोलन उभारण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे या वेळेस आप चे युवा जिल्हाध्यक्ष मयुर राईकवार, जिल्हा कोषाध्यक्ष भिवराज सोनी, जिल्हा सोशल मिडिया हेड राजेश चेटगुलवार,संतोष बोपचे सोबत परिसरातील जेष्ठ नागरिक नंदू रुक्मांगत,इंद्रपाल यादव, वामनराव नंदुरकर तथा ईतर अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here