इर्ला मशीद बस स्थानकावर दलित पँथर च्या प्रयत्नाने बससेवा पूर्ववत

0
428

इर्ला मशीद बस स्थानकावर दलित पँथर च्या प्रयत्नाने बससेवा पूर्ववत

 

impact24news Team

मुंबई : दलित पॅंथर राष्ट्रीय अध्यक्षा मल्लिकाताई ढसाळ यांच्या मार्गदर्शनात दलित पॅंथर मुंबई प्रदेश कार्यकर्त्यांनी ४ ऑक्टोंबर २०२१ रोजी सांताक्रुज बस आगार व्यवस्थापक यांची दलित पँथर मुंबई सचिव योगेश कांबळे, मुंबई उपनगर जिल्हा उपाध्यक्ष संजय किसन शिंदे, मुंबई उपनगर जिल्हा उपाध्यक्ष संदेश संगारे यांनी सांताक्रूझ आगर व्यवस्थापक यांच्या सहकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी लेखी निवेदन देऊन इर्ला मशिद बस स्थानकावर बरेच महिन्यांपासून बस थांबत नसल्याने प्रवाशांना होणाऱ्या त्रासाबद्दल आगार व्यवस्थापक ह्यांना पुराव्यासहीत माहिती लेखी निवेदनामार्फत दिली. बस आगार व्यवस्थापकांनी ताबडतोब त्यांच्या सहकाऱ्यांना तेथे तपासणी करून निरीक्षण करण्याचे आदेश दिले. दलित पॅंथर चा पाठपुरावा आणि प्रयत्नाने तसेच सांताक्रुज आगार व्यवस्थापकांच्या मदतीने सदर समस्येचे निरसन करण्यात आले असून नागरिकांचा प्रश्न मिटवण्यात आलेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here