निमणी येथे रासेयो शिबिराचा समारोप

0
357

निमणी येथे रासेयो शिबिराचा समारोप

उत्कृष्ट स्वयंसेवक व ५० वृद्धांचा सत्कार

 

बाखर्डी:-शरदराव पवार कला व वाणिज्य महाविद्यालय गडचांदूर व आय एस ओ ग्रामपंचायत निमणी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद शाळा निमणी येथे २३ मार्च ते २९ मार्च पर्यंत चालणाऱ्या शिबिराचा समोरोपीय कार्यक्रम जिल्हा परिषद शाळा निमणी येथे पार पडला.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ संजयकुमार सिंह तर प्रमुख अतिथी म्हणून माजी प्राचार्य दौलतराव भोंगळे प्रमुख पाहुणे आय क्यू ए सी समन्वयक प्रा डॉ संजय गोरे कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ शरद बेलोरकर प्रा डॉ हेमचंद दुधगवळी प्रा डॉ सुनील बिडवाईक प्रा डॉ राजेश गायधनी उपसरपंच उमेश राजूरकर प्रा डॉ माया मसराम प्रा मंगेश करंबे प्रा डॉ सतेंद्र सिंह माजी पो.पा मोतीराम ठवसे विलास कोंगरे बबन पिदूरकर ग्रामपंचायत सदस्य मारोती कोडापे आदी उपस्थित होते.

पुढे भोंगळे म्हणाले की,विद्यार्थ्यांनी आपली नाळ ग्रामीण भागाशी कायम ठेवली पाहिजे अनुकूल परिस्थितीची वाट पाहत बसण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती केली तर नक्की यश मिळेल असेही सांगितले.

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ संजयकुमार सिंह यांनी सांगितले की खऱ्या अर्थाने राष्ट्रीय एकात्मता जोपासण्याचे काम राष्ट्रीय सेवा योजना करत आहे विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय सेवा योजना ही निरंतर सेवा आहे. असेही आवर्जून सांगितले.
दिनांक २३ मार्च ते २९ मार्च या कालावधीत ग्रामसफाई पशुचिकित्सा शिबीर सायबर गुन्हे महिलांचे संरक्षण विषयक कायदे रक्तगट तपासणी व्यसनमुक्ती अभियान पर्यावरण मतदार जागृती महिलांचे हळदीकुंकू व गावात भजन दिंडी काढून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली निमणी येथील ५० जेष्ठ नागरिकांचा व उत्कृष्ठ शिबिरार्थ्याचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ शरद बेलोरकर संचालन वैभवी लांडे तर आभार अंकित चन्ने यांनी मानले यावेळी रासेयो स्वयंसेवक जेष्ठ महिला पुरुष व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here