संपावर असलेल्या एस टी कर्मचाऱ्यांना यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने जिवनावश्यक वस्तुंच्या किटचे वाटप

0
513

संपावर असलेल्या एस टी कर्मचाऱ्यांना यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने जिवनावश्यक वस्तुंच्या किटचे वाटप

 

विलनीकरणाच्या प्रमूख मागणीला घेऊन मागील १०६ दिवसांपासून संपावर असलेल्या एस टी कर्मचाऱ्यांची आर्थिक परिस्थीती हालाकीची झाली आहे. त्यामूळे याची दखल घेत सदर कर्मचाऱ्यांना यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने जिवनावश्यक किटचे वाटप करण्यात आले. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, शहर संघटक पंकज पुप्ता, आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेश कूळमेथे, अल्पसंख्याक विभागाचे शहर युथ प्रमूख राशेद हुसेन, यंग चांदा ब्रिगेडच्या विज कामागर संघटनेचे विश्वजित शाहा, संघटक रुपेश पांडेय, गौरव जोरगेवार, आशा देशमूख आदिंची उपस्थिती होती.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ राज्य शासनात विलीन करण्यात यावे, राज्य परिवहन मंडळाचा अर्थसंकल्प राज्याच्या अर्थसंकल्पात समाविष्ट करण्यात यावा, एस. टी कर्मचाऱ्यांना समान काम समान वेतन या तत्वावर किमान वेतन कायद्यानुसार १ एप्रिल २०१६ पासून १८ हजार मूळ वेतन देण्यात यावे, ७ व्या वेतन आयोगानूसार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सेवाजेष्ठतेप्रमाणे वेतनश्रेणी लागू करण्यात यावी या प्रमूख मागण्यांना घेऊन राज्य महामंडळच्या कर्मचाऱ्यांनी चंद्रपूर बस स्थानक येथे आंदोलन सुरु केले आहे. आज या आंदोलनाचा १०६ वा दिवस असला तरी त्यांच्या अनेक मुख्य मागण्या मान्य झालेल्या नाहीत. परिणामी त्यांचे आंदोलन सुरुच आहे. या आंदोलनात चंद्रपूरातील ९२ टक्के कर्मचारी सहभागी झाले आहे. मात्र आता आंदोलनकर्ता कर्मचाऱ्यांची आर्थिक परिस्थीती खालावली आहे. त्यामूळे त्यांच्या परिवाराचा उदर्निवाह करण्याचा मोठा प्रश्न त्यांच्यापूढे उभा आहे. याची दखल आता यंग चांदा ब्रिगेड संघटनेच्या वतीने घेण्यात आली असून सदर कर्मचाऱ्यांना जिवनावश्यक वस्तुंच्या किटचे वाटप करण्यात आले आहे. यावेळी चंद्रपूर आगार आणि चंद्रपूर विभाग कार्यालय अशा दोन ठिकाणी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने सदर जिवनावश्यक वस्तुंची किट एस. टी कर्मचाऱ्यांना वितरीत केली. यावेळी संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. जिवनावश्यक वस्तुंची किट दिल्या बदल उपस्थित कर्मचाऱ्यांनी यंग चांदा ब्रिगेडचे आभार मानले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here