गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध – प्रियंका दिवे

0
547

गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध – प्रियंका दिवे

आवाळपुर येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन संपन्न

 

नितेश शेंडे, प्रतिनिधी
आवाळपुर : कोरपना तालुक्यातील आवाळपुर येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन नुकतेच सरपंचा प्रियंका दिवे यांच्या हस्ते पार पडले. यामध्ये ग्रामपंचायत मार्फत सामान्य फंडातून कढोली मार्गापासून ते स्मशानभूमी पर्यंतच्या रस्त्याचे खडीकरण करणे व चौदावा वित्त आयोग तथा सामान्य फंडातून शास्त्री नगर वार्ड क्रमांक 1 मधील प्रभाकर कुसराम यांच्या घरापासून तर रमाई चौकापर्यंत काँक्रीट रस्त्याचे बांधकाम करणे इत्यादी विकासकामांचा समावेश आहे. यावेळी उपस्थितांनी सरपंच प्रियंका दिवे, उपसरपंच बाळकृष्ण काकडे यांच्या कार्याचे काैतुक केले. सरपंच प्रियंका दिवे यांनी आगामी काळात शासकीय योजनेतून आणखी निधी आणणार असल्याचे सांगितले. गावाच्या विकासासाठी आम्ही प्रयत्नशील असून राजकारण न करता विकासाला प्राथमिकता देऊन कामे करण्यात येईल असा विश्वास उपसरपंच बाळकृष्ण काकडे यांनी उद्घाटनाप्रसंगी बोलताना व्यक्त केला. उद्घाटन स्थळी ग्रामपंचायत आवाळपुर चे ग्राम विकास अधिकारी प्रवीण ठाकरे,ग्रामपंचायत सदस्य विकास दिवे, सुरेश दिवे, कान्होबा भोंगळे, ग्रामपंचायत सदस्या सुश्मिता पाणघाटे, नंदा सूर, कंत्राटदार निलेश बोनगीनवार, किसन कडुकर, तथा गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी गावात होणाऱ्या विकासकामांवर गावातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here