कामगार-कर्मचारी यांना कोव्हिड लस घेण्याच्या सक्ती संदर्भात शासनाकडे विविध लिखित हमीपत्राची मागणी राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ यांचे तहसीलदार राजुरा मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर

0
458

कामगार-कर्मचारी यांना कोव्हिड लस घेण्याच्या सक्ती संदर्भात शासनाकडे विविध लिखित हमीपत्राची मागणी

राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ यांचे तहसीलदार राजुरा मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर

राजुरा, अमोल राऊत (१३ एप्रिल) : राज्यात कोरोना महामारीच्या अनुषंगाने राज्यातील शासकीय, निमशासकीय, खाजगी उद्योग कंपनी मध्ये कार्य करणाऱ्या कामगार व कर्मचारी यांना जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार तसेच इतर विभागातील विभाग प्रमुखांनी प्रशासनाच्या आदेशाला प्रमाण मानून विशिष्ट तारखेपर्यंत कोव्हिड लस घेण्याची सक्ती केली आहे.
देशात कोव्हिड लसीकरण मोहिमेच्या दरम्यान काही कर्मचारी व नागरिक यांनी लस घेतल्यानंतर मृत्यू पावले आहेत, याची प्रशासनाला माहिती आहे. याबाबत विविध वृत्तपत्रातून बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. तसेच जे कर्मचारी दीर्घ आजाराने ग्रस्त आहेत त्यांना हि लस घेतल्यानंतर विपरीत परिणाम होत आहेत. त्यामुळे राज्यातील कर्मचारी व कामगार भयभीत झाले आहेत. अशा स्थितीत शासनाने लस न घेतल्यास वेतन कपात व दंडात्मक कारवाई करण्याचे निर्गमित केले आहे.
संपूर्ण देशात कर्मचारी व कामगार यांचे हक्क अधिकार अबाधित ठेवण्याकरिता राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ कार्यरत असून त्यांचे प्रतिनिधीत्व करत आहे. यासाठी सर्व कर्मचारी व कामगार यांच्या वतीने जिल्हा प्रशासनाकडून लिखित हमीपत्र देण्याची मागणी करत आहे.
जे कामगार दीर्घ आजाराने ग्रस्त आहेत त्यांना लस घेतल्यावर त्यांच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम होणार नाही. सदर लस घेतल्यानंतर १०० टक्के कोरोना आजार होणार नाही. एखादा कर्मचारी लसीकरण नंतर दगावल्यास त्याच्या कुटुंबातील एका व्यक्तीला त्याच विभागात, त्या पदावर, त्याच वेतनानुसार नोकरी देण्यात यावी. तसेच सदर कुटुंबास उदरनिर्वाहासाठी किमान एक कोटी तर कमाल पाच कोटी रुपये देण्यात यावे. या लसी संदर्भात वैज्ञानिकांकडून जी तपासणी झाली आहे. त्याचा अहवाल सामान्य नागरिक, मजूर, कामगार, कर्मचारी यांना देण्यात यावा.
सदर मागणीचे हमीपत्र राज्य, जिल्हा, तालुका प्रशासनाकडून देण्यात यावे, यानंतरच कोव्हिड लस घेण्याची सक्ती करण्यात यावी. अशा मागणीचे निवेदन प्रदेशाध्यक्ष राजेंद्र इंगोले, राज्य कार्याध्यक्ष किशोर शिंदे, राज्य महासचिव राजेंद्र राजदीप यांच्या मार्गदर्शनात तहसीलदार राजुरा यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना काल देण्यात आले. यावेळी गौतम रत्ने, के एस बावणे, एस एम किनगे, डी एस पाटील, डी आर दुर्योधन, एल जी वाघमारे, बी बी फुलझेले, एस वि बोबाटे, एन वि वनकर, सी जे तेलंग, एस वि जुलमे, एस आर बोबाटे, डी एम मडावी, एन एस कोडापे, सी आर देठे, ई बी सातपुते, जी डी चौरे सह आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here