राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कोंडाळा येथील विविध पक्षातील शेकडो लोकांचा पक्ष प्रवेश

0
472

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कोंडाळा येथील विविध पक्षातील शेकडो लोकांचा पक्ष प्रवेश

सुखसागर झाडे । राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे अध्यक्ष पक्षाचे सर्वेसर्वा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब.
प्रदेशाध्यक्ष मा. ना.जयंत पाटील साहेब, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.अजित दादा पवार साहेब व गडचिरोली जिल्ह्याचे नेते आमचे मार्गदर्शक आदरणीय आमदार राजे धर्मरावबाबा आत्राम साहेब यांच्या कार्यकर्तृत्वा वर विश्वास ठेवून.
आज देसाईगंज येथे महाराष्ट्र राज्याचे प्रदेश संघटक सचिव मा युनूस भाई शेख तथा गडचिरोली जिल्हा सरचिटणीस मा.शामजी धाईत साहेब व राष्ट्रवादीचे देसाईगंज तालुक्याचे अध्यक्ष तथा खंबीर नेतृत्व मा. क्षितिज भाऊ उके यांच्या नेतृत्वात विविध पक्षात काम करणाऱ्या व्यक्तींनी राष्ट्रवादी कांग्रेस पक्षा मध्ये पक्षाचा दुप्पटा टाकून प्रवेश करून घेतला व पक्ष बळकटी करण्यासाठी सदैव प्रयत्न करण्याचा संकल्प केला.
या प्रसंगी पक्षात प्रवेश करतांना भुवन भाऊ लिल्हारे जिल्हा अध्यक्ष कला व सांस्कृतिक विभाग, कपिल बोरकर तालुका अध्यक्ष सोशल मीडिया विभाग, रोशन शेंडे तालुका उपाध्यक्ष, विकास उरकुडे व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here